आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Papya Shaikh News In Marathi, Police, Crime, Divya Marathi

‘पाप्या’चा घडा भरला, त्याच्यासह फरार 4 कैदी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - कोपरगाव येथील सबजेलमधून पळालेल्या पाप्या शेख व इतर तिघांना गुरुवारी सकाळी अबसरी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील घरातून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या कैद्यांना आश्रय देणा-या इमाम चाँद शेख यालाही पोलिसांनी अटक केली.

पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख, विनोद सुभाष जाधव, आबासाहेब लांडगे व सागर काळे अशी आरोपींची नावे आहेत. विकास चव्हाण अद्याप फरार आहे. हे आरोपी अबसरी येथे असल्याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांचे पथक 1 मे रोजी पहाटे 4 वाजता तेथे पोहोचले. पोलिस आल्याचे कळताच तिघांना दुचाकीवर बसवून गावडेवाडीकडे पळणा-या पाप्याने पोलिस निरीक्षक संपत भोसले यांच्या अंगावर गाडी घातली. भोसले यांचा हात फ्रॅक्चर झाला. नंतर आरोपींची दुचाकी दगडाच्या ढिगावर जाऊन आपटून ते जखमी झाले. त्याही अवस्थेत पळताना त्यांनी पोलिसांवर दगडांचा वर्षाव सुरू केला. मात्र जखमी अवस्थेत आरोपींना पळता येईना झाले. त्याच वेळी पोलिसांनी तातडीने झडप घालून आरोपींना अटक केली.