आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेडने राखली पालकमंत्री राम शिदेंची अब्रू, पंचायत समिती व जि.प मध्‍ये भाजपला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - जामखेड तालुक्यात पहिले तीन असलेले गट रचनेमध्ये दोन झाले, तर पंचायत समितीचे सहा असलेले गण यावेळी चार झाले. पालकमंत्री राम शिंदे यांचा तालुका आहे. या तालुक्यात दोन्ही गट चारही गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी ठरले. जिल्ह्यात भाजपचा फोर्टी प्लसचा नारा देणाऱ्या पालकमंत्री राम शिंदे यांची अब्रू जामखेड तालुक्यानेच राखली. 
 
खर्डा गटात भाजपच्या वंदना लाेखंडे विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाई लोंढे यांना पराभूत केले. जवळा गटामध्ये भाजपचे सोमनाथ पाचारणे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बबन तुपेरे यांचा पराभव केला. पंचायत समितीमध्ये खर्डा गणामध्ये भाजपच्या मनीषा सुरवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीवनी पाटील यांचा पराभव केला. साकत गणात भाजपच्या डॉ. भगवान मुरूमकर यांनी राष्ट्रवादीच्या संजय वराट यांना धूळ चारली. हाळगाव गणामध्ये भाजपच्याच राजश्री मोरे यांनी राष्ट्रवादीच्या शकुंतला निगुडे यांचा पराभव केला. जवळा गणामध्ये भाजपच्या सुभाष आव्हाड यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. गोरख भवाळ यांना पराभूत केले. त्यामुळे दोन्हीही गटांमध्ये आणि चारही गटांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले. 
बातम्या आणखी आहेत...