आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parents Should Provide Favourable Education To Chil Dilip Walse Patil

पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे - दिलीप वळसे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - पालकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण न देता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण द्यावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांनी केले.

कर्जत येथील अभयसिंह राजेंद्र फाळके या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्याचा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात वळसे बोलत होते. पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील, नामदेव राऊत, नानासाहेब निकत, अशोक खेडकर, काकासाहेब तापकीर, अनिल जेवरे, उत्तम नेवसे, दीपक शहाणे, सचिन पोटरे, सचिन घुले, प्रसाद ढोकरीकर, आनंदराव तोडमल आदी यावेळी उपस्थित होते. वळसे म्हणाले, परीक्षा असो अथवा राजकारण हे कष्ट व सातत्य याच्यावर अवलंबून असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदाच संधी मिळते, ती वारंवार मिळत नाही. त्या संधीचे सोने करणे गरजेचे असते. आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. बबनराव पाचपुते म्हणाले, सध्याचे युग हे विविध टेक्नॉलॉजीचे आहे. आज ज्ञानाला मोठे महत्त्व आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देणेही गरजेचे आहे. राजेंद्र फाळके यांच्या मुलाने देशाच्या सर्वोच्च परीक्षेत यश मिळवले आहे. हे फार मोठे यश आहे. तो आदर्श सर्वांनी घ्यावा. प्राचार्य बाळ कांबळे म्हणाले, दादा पाटील महाविद्यालयात लवकरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.