आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पार्किंगखाऊं'च्या विरोधात यािचका, शपथपत्र सादर करण्याचे महापालिकेला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील पार्किंगखाऊ रुग्णालयांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. महापालिकेकडून रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी महापालिकेने शपथपत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पार्किंग नसलेल्या रुग्णालयांच्या विरोधात मनपा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका हद्दीत तब्बल ३१२ क्लिनिक १३९ रुग्णालये आहेत. सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम १९४९ नुसार क्लिनिक रुग्णालयांची नोंदणी केली आहे. मात्र, ही नोंदणी करताना अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनी मनपाच्या नगररचना विभागाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. शिवाय बांधकाम परवाना घेताना रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे केलेले नाही. पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनेकांनी अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. मनपाने अशा १२० रुग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी ५२ रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे अंतिम आदेशही दिले होते. परंतु तत्कालीन आयुक्त विजय कुलकर्णी आताचे आयुक्त विलास ढगे यांनी ही कार्यवाही थांबवली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काही रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम काढूनही घेतले होते. परंतु अजूनही काही रुग्णालयांनी राजरोसपणे पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे. मनपा प्रशासन यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करत नसल्याने शेख यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाने शेख यांची याचिका दाखल करून घेत त्यावर २० नोव्हेंबरला सुनावणी घेतली. त्यात मनपाने पार्किंग नसलेल्या रुग्णालयांच्या कारवाईबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पार्किंग नसलेल्या रुग्णालयांची डोकेदुखी वाढणार आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मनपा प्रशासन काय भूमिका घेते याकडे रुग्णालयांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रुग्णालये एकूण नोंद
१२०- रुग्णालयांना नोटिसा
१३९- एकूणरुग्णालये
३१२- एकूणक्लिनिक
५२- अंतिम नोटिसा
मनपाने कारवाई करावी
शहरातअनेकरुग्णालयांनी सर्व नियम धाब्यावर बसून अनधिकृत बांधकाम केले आहे. यासंदर्भात मनपाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. आरोग्य संचालकांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात कारवाई झालीच नाही. त्यामुळेच न्यायालयात धाव घेतली आहे.'' शाकीर शेख, सामाजिककार्यकर्ते.

वैद्यकीय व्यावसायिकांकडून दबावतंत्राचा वापर
उपायुक्त अजय चारठाणकर यांनी पार्किंग नसलेल्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारताच वैद्यकीय व्यावसायिकांनी दबावतंत्र सुरू केले. कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. चारठाणकर यांनी काही रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे अंतिम आदेशही दिले होते, परंतु पुढील कार्यवाही झालीच नाही.
बातम्या आणखी आहेत...