आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेर कारखाना विक्रीला सभासदांचा कडाडून विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्यबँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी पारनेर सहकारी साखर कारखाना विकण्याची राबवलेल्या प्रक्रियेविरोधात सभासद आक्रमक झाले आहेत. बँकेची १९ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी एकरकमी भरण्याची तयारीही दर्शवून सभासदांनी तालुक्यातील सहकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. सहकारमंत्र्यांनी कारखाना विक्रीची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी पारनेरकरांकडून होत आहे.
पारनेर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या पारनेर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ १९८४ मध्ये झाली. त्यावेळी ५० टक्के शेतकऱ्यांचे शेअर्स उर्वरित केंद्र राज्य सरकारच्या हिश्श्यातील कोटी रुपये खर्चातून कारखाना सुरळीत सुरू झाला. सन १९९७-९८ मध्ये कारखाना आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे १० कोटी रुपयाचे कर्ज घेण्यात आले. राज्य बँकेचे कर्ज डिसेंबर २००४ मध्ये व्याजासह ४५ कोटी १० लाख रुपयांवर पोहोचले. निर्वाचित संचालक मंडळाची मुदतही त्याच वर्षी संपली. राजकीय कुरघोड्यातून संचालक मंडळाची निवडणूकच झाली नाही. परिणामी हा कारखाना अवसायनात काढण्यात आला, तर सन २००५-०६ मधील गाळप बंद राहिले.

सन २००६ मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने वर्षांसाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला. सन २००६ ते २०११ पर्यंत वैद्यनाथने यशस्वीपणे गाळप केले. कराराची मुदत संपल्यानंतर मुंडे यांनी १० वर्षांसाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली. मात्र, राज्य स्तरावरील राजकारणातून त्यांची मागणी फेटाळली गेली. सन २०११ ते २०१३ या दोन वर्षांसाठी कारखाना पुण्याच्या बीव्हीजी शुगर्सला भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात आला. पहिल्या वर्षी गाळप झाले, पण त्यानंतरच्या वर्षात हंगाम बंद ठेवण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत कारखानाचे गाळप बंद आहे.

राज्य बँकेचे सन २००५ मध्ये असलेले ४५ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज सध्या १९ कोटी ५२ लाखांपर्यंत खाली आले अाहे. भाडेकरारातून मिळालेेले १३ कोटी १५ लाख, तसेच कोर्ट गॅरंटीचे १२ कोटी ३४ लाख राज्य बँकेकडे वळते झाले. त्यातही बीव्हीजी शुगर्सने एका वर्षाच्या भाडेकराराचे कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीत. भाडेकरारातून वसुली होत असतानाही राज्य बँकेने कारखाना विक्रीसाठी एप्रिल २०१५ मध्ये ८० कोटी रुपयांची निविदा काढली. प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा जूनमध्ये ७४ कोटी रुपयांची निविदा काढली. ३१ कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेला बँकेने मंजुरी दिली असून विक्रीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
गेल्या ३० वर्षांतील २२ वर्षांत कारखान्याने यशस्वीपणे गाळप हंगाम पार पाडला. सभासद शेतकऱ्यांच्या पैशांतून उभारलेला कारखाना कवडीमोल भावात विकण्यात येत असल्याचा सभासदांचा आराेप आहे. कारखाना वाचवण्यासाठी सभासद प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सहकारमंत्र्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. सभासदांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली असून त्यांच्याकडून विक्रीची प्रक्रिया रद्द होईल, अशी अपेक्षा पारनेरकरांना आहे. बँकेचे कर्ज एकरकमी भरून कारखाना १० वर्षे भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा सभासदांचा प्रस्ताव आहे.
माहिती मागवली
^पारनेरकारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. बँकेने त्यांच्या स्तरावर काही प्रक्रिया राबवली असल्यास, त्याची माहिती देण्यास कळवले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणतीही माहिती आम्हाला प्राप्त झालेली नाही.'' मिलिंदभालेराव, अवसायक,पारनेर सहकारी साखर कारखाना.

एकूण देणी ६८ कोटी
कारखान्याचीमार्च २०१५ अखेरची एकूण देणी ६५ कोटी ९३ लाख, तर एकूण येणी १६ कोटी रुपये आहेत. कारखान्यात १८९ कायम, तर २३९ हंगामी कामगार आहेत. कारखान्याची विक्रीतून कामगार देशोधडीला लागण्याची भीती आहे, तर जवळपास १५ हजार सभासद आहेत. कारखान्यामुळे तालुक्यातील पिंपळगाव जोगा, घोड कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात वाढलेल्या उसाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

मालमत्ता १७५ कोटींची
"पारनेर'कडे१६० हेक्टर स्वमालकीची जमीन होती. त्यातील ६० हेक्टर जमीन कृष्णा खाेरे विकास महामंडळाने पिंपळगाव जोगा कालव्याच्या टेलटँकसाठी संपादीत केली. मात्र, या भूसंपादनाचा मोबदला न्यायालयीन स्थगितीमुळे मिळालेला नाही. बिगरशेती केलेली ५३ हेक्टर जमीन कारखान्याकडे आहे. कारखान्याच्या मालमत्तेचे बाजारमूल्य १७५ कोटींच्या घरात असताना अवघ्या ३१ कोटी ७१ लाखांत कारखाना विकण्यात येत आहे.

अन्यथा न्यायालयात दाद
कारखानाविक्रीची प्रक्रिया सहकारमंत्र्यांकडून रद्द होईल, अशी अपेक्षा आहे. १० वर्षांसाठी सक्षम व्यक्तीकडे कारखाना भाडेतत्त्वाने देऊन बँकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड शक्य आहे. अशी व्यक्ती आम्ही शोधली असून त्यानुसार प्रक्रिया व्हावी; अन्यथा न्यायालयात दाद मागू.'' रामदासनंदू घावटे, सभासद.