आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेरच्या शाळकरी मुलाची शिर्डीत सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकणार्‍या रामेश्वर नामदेव ठाणगे या विद्यार्थ्याची शिर्डी येथे सुटका करण्यात आली. शनिवारी दुपारी शाळेकडे जात असताना शिवराज शिंदे याने त्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर शाळेत जात असताना त्याला शिवराज रस्त्यात भेटला. जुनी ओळख सांगून त्याने रामेश्वरला पारनेर बसस्थानकामधून नाशिककडे जाणार्‍या एसटी बसने नगरला आणले. नंतर चाकूचा धाक दाखवत रामेश्वरला रेल्वेने प्रथम दौंड व नंतर पुणे येथे नेण्यात आले. पुण्याला गेल्यानंतर शिवराजने त्याच्या एजंटाला फोन करून रामेश्वरला पुण्यात आणल्याचे सांगितले.

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर रामेश्वरचे वडील नामदेव ठाणगे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शोधाशोध करूनही रामेश्वर सापडला नाही. शिर्डी येथे त्याला नेण्यात आले असावे, असा संशय आला. शिर्डीत त्याला शोधले असता रामेश्वर व शिवराज हे फूटपाथवर झोपलेले आढळले. रामेश्वरची सुटका करून पारनेर येथे आणण्यात आले. अपहरण कशासाठी केले याचे गूढ उलगडलेले नाही. तपास निरीक्षक सुनील शिवरकर करत आहेत.