आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्ती बारव स्वच्छता अभियानात तुम्हीही व्हा सहभागी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराच्या ऐतिहासिक खापरी नळ पाणी योजनेचा एक भाग असलेल्या हत्ती बारवेच्या स्वच्छतेसाठी येत्या रविवारी (२० मार्च) सकाळी विशेष अभियान राबवले जाणार आहे. या मोहिमेत तुम्हीही सहभागी होऊ शकता. जिल्हाधिकारी अनिल कवडे मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी वाजता हत्ती बारवेच्या स्वच्छतेला प्रारंभ होणार आहे.

निजामशाहीत, तसेच नंतरच्या काळात डोंगरावरील पाणी अडवून, तलावात बारवांमध्ये साठवून तेथून खापरी नळाने नगर शहरातील विविध भागांना पाणी पुरवले जात असे. फराहबख्क्ष महाल हश्त-बेहश्त महालांतील कारंजांसाठी याच पद्धतीने पाणी खेळवण्यात आले होते. शहरातील प्रत्येक चौकात पाण्याचे हौद कारंजी होती. एकूण पंधरा खापरी योजना त्या काळात तयार करण्यात आल्या होत्या.

खापरी नळ योजनांपैकी काही तलाव, बारवा उसासे अजूनही शहर परिसरात पहायला मिळतात. नगर-जामखेड रस्त्यावरील, शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर असलेली हत्ती बारव ही त्यातील एक. या बारवेला चारही बाजूने शेवटपर्यंत पायऱ्या असून एका बाजूला मोटेने पाणी उपसून खापरी नळाने ते अन्यत्र नेण्याची व्यवस्था आहे.

पावसाळ्यात हत्ती बारवेत पाणी साचते, तथापि, तेथे मूर्तींचे, निर्माल्याचे विसर्जन केले जात असल्याने बारवेची अवस्था खराब झाली आहे. या बारवेत साचलेली घाण काढण्याबरोबर ती कायमस्वरूपी स्वच्छ कशी राहील, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमात जिवाशी ट्रेकर्स, विश्वभारती अभियांत्रिकी, सीएसआरडी, चांदबिबी मॉर्निंग ग्रूप, स्वागत अहमदनगर, अहमदनगर टुरिझम फोरम, समर्थ अॅकॅडमी (म्हसणे फाटा), दरेवाडी निंबोडी सरपंच आदी सहभागी होणार आहेत. नगरकरांनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे.
निजामशाहीकालीन हत्ती बारवेचे चार वर्षांपूर्वीचे संग्रहित छायाचित्र.
औचित्य 'जलदिना'चे...
२२मार्च हा दिवस 'जलदिन' म्हणून साजरा केला जातो. त्याआधी दोन दिवस हत्ती बारव स्वच्छ करण्यात येईल. यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने या बारवेत चांगला पाणीसाठा होऊ शकेल. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. सकाळी साडेसात वाजता हत्तीबारवेजवळ जमायचे आहे. येताना टोपी, पाण्याची बाटली, तसेच एखादी गोणी आणावी. अधिक माहितीसाठी डॉ. उमेश निंबाळकर (८४२१७९४१०१) यांच्याशी संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...