आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षादेश डावलल्याप्रकरणी २१ जुलैला सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौर पदाच्यानिवडणुकीत पक्षादेश डावलल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भाेसले, नगरसेविका सुवर्णा जाधव वीणा बोज्जा यांना विभागीय आयुक्तांनी नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर सोमवारी सुनावणी होणार होती, परंतु आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी चारही नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानुसार याप्रकरणी पुढील सुनावणी २१ जुलैला होणार आहे.
महापालिकेच्या जून रोजी झालेल्या महापौर निवडणुकीत मनसेच्या चारही नगरसेवकांनी पक्षादेश पाळता आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान केले. चारही नगरसेवकांनी युतीचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करावे, असे पक्षादेश होते. परंतु एेनवेळी या नगरसेवकांनी आदेश पाळले नाहीत. त्यामुळे चारही नगरसेवकांविरोधात पक्षासह जाधव यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (६ जुलै) सुनावणी होणार होती. आपले म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी नोटिशीद्वारे चारही नगरसेवकांना दिल्या होत्या. परंतु म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानुसार त्यांना २१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापौर निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या या चौघा नगरसेवकांवर काय कारवाई होते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.