आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनिका यांच्या मंत्रिपदासाठी पंकजा यांना साकडे घालणार, कार्यकर्त्यांचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - माजी आमदार राजीव राजळे यांच्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे, विशेषत: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे घालण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात केला.
 
वृध्देश्वर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम समारंभास पाथर्डी शेवगाव तालुक्यातील राजळे समर्थकांसह विविध पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अप्पासाहेब राजळे होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तिसगावचे सरपंच काशीनाथ लवांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, सोमनाथ खेडकर, माजी सभापती मिर्झा मण्यार, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शेवगावचे नगरसेवक अरुण मुंडे, महेश फलके, ज्येष्ठ नेते मिठुभाई शेख, दिनेश लव्हाट, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, येळीचे सरपंच संजय बडे, जवखेडे दुमालाचे सरपंच सचिन नेहूल, मोहज देवढेचे सरपंच गणेश चितळकर, अकोल्याचे उपसरपंच नारायण पालवे आदींसह कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थांचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. मात्र, आमदार मोनिका यांनी अजून तरी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेत तसा संदेश पाठवला. सर्वच वक्त्यांनी आमदार राजळेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
 
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक उध्दव वाघ म्हणाले, संचालक मंडळाच्या निर्णयानुसार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना खताच्या स्वरूपात एकरी एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. गरजेएवढा ऊस कार्यक्षेत्रात उत्पादन करण्यावर संचालक मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. पाच लाख टन उसाचे गाळप करून साडेपाच लाख टन साखरेचे उत्पादन करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून त्या दृष्टीने नियोजन पूर्ण होऊन प्रत्यक्ष गाळपाला प्रारंभ झाला आहे. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले, तर आभार उद्धव वाघ यांनी मानले.
 
ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न
प्रास्ताविककरताना कार्यकारी संचालक जालिंदर पवार म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांची कसर यावर्षी पावसाने भरून काढली. ऊसक्षेत्र वाढ ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देण्याचा वृध्देश्वरचा प्रयत्न राहील. माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आमदार मोनिका राजळे यांच्या रूपाने भरून निघून वृध्देश्वरची वाटचाल यशाकडे होत राहील. कार्यक्षेत्रात तीन लाख टन ऊस उपलब्ध असून बाहेरील दोन लाख टन उसाचे करार पूर्ण झाले आहेत. यंदा प्रथमच ऊसतोडणी यंत्राचा वापर होणार असल्याने तोडणीचा वेग वाढणार आहे. चार हजारांहून अधिक तोडणी मजुरांचे करार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...