आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pass Janlokpal Bill This Session, Says Anna Hazare

लोकपाल बिल मंजूर करा : अण्णांचे पंतप्रधानांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - रामलीला मैदानावर दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करण्याची आठवण करून देतानाच संसदेच्या चालू अधिवेशनातच जनलोकपाल बिल राज्यसभेत मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही त्याची प्रत पाठवण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून 24 जुलै 2013 रोजी अण्णांना आलेल्या पत्रात पावसाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल राज्यसभेत मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अण्णांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यसभेच्या निवड समितीने विधेयक 23 नोव्हेंबर 2012 रोजी मान्यतेसाठी सादर केले. अधिवेशन संपण्यास फार काळ उरला नसल्याने हे बिल तातडीने मंजूर व्हावे.

भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीची देशातील 120 कोटी जनता मागणी करीत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करणे सरकारचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून सरकार या अधिवेशनात या बिलास मंजुरी देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.