आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांकडूनही प्रवाशांची प्रचंड लूट, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. मागण्यांबाबत तोडगा निघाल्याने दुसऱ्या दिवशी संप राहिला. त्यामुळे हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दिवाळी सणाला गावी जाण्यासाठी निघालेल्या या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. खासगी वाहतूकदारांनी देखील प्रवाशी दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे या प्रवाशांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. 
 
महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) इतर मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बेमुदत संपामध्ये एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. दरम्यान, कामावर हजर होणाऱ्या एसटी कर्मचसऱ्यांना राज्य सरकारने अल्टीमेटम दिला आहे. बुधवारी कामावर हजर झाल्यास या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचारी संघटनांनी मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत संप सुरूच ठेवला आहे. शहरातील सर्वच बसस्थानक ओस पडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पुकारण्यात आलेल्या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसला. एस. टी. चा पर्याय उपलब्ध नसल्याने गावी जाण्यासाठी खासगी गाड्या भरून प्रवाशांची वाहतूक सुरू होती. अनेकांनी प्रवासी भाडे परवडत नसल्याने ट्रकमध्ये प्रवास करणे पसंत केले. खासगी बस, जीप, कार यांनी प्रवासी दरात वाढ केली. 
 
प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे 
एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या काळात चुकीच्या पध्दतीने संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन खात्याने तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. शाळांच्या स्कूल बसेस इतर वाहने उपलब्ध करून देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश सर्व तहसीलदारांना देण्यात आल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण 
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेतनात मोठी तफावत निर्माण होऊन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती महागाई कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार यात मोठी तफावत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे संपात सहभागी झालेल्या संघटनांचे म्हणणे आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...