आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षास नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाथर्डी नगरपालिकेने केलेल्या कामाच्या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व बांधकाम समितीच्या सभापतीस अपात्र का करू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या संदर्भात 15 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

हंडाळवाडी येथील सुभाष हंडाळ यांनी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष दीपाली बंग व बांधकाम समितीचे सभापती बंडू ऊर्फ रणजित बोरुडे यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. पालिकेने नोव्हेंबर-डिसेंबर 2012 मध्ये केलेले एम. एम. निर्‍हाळी विद्यालय ते संस्कारभवन या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि चिंचपूर रस्त्यावरील बंदिस्त गटाराचे काम नियमबाह्य पद्धतीने केले. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व बांधकाम समितीच्या सभापतीवर महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 44 ई अन्वये अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगराध्यक्ष आव्हाड यांच्या विरोधात आणखी एक तक्रार हंडाळ यांनी केली आहे. आव्हाड हे पार्थ विद्याप्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष व प्राध्यापक आहेत. लाभाची तीन पदे भूषवत असल्याने त्यांना नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 16 अन्वये अपात्र करावे, अशी मागणी हंडाळ यांनी केली.