आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवन नाईक यांचे दूरदर्शनवर गायन...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- येथील प्रसिद्ध गायक पवन श्रीकांत नाईक व त्यांच्या सहकार्‍यांना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने दीपावलीच्या विशेष कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. रविवारी (3 नोव्हेंबर) सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत प्रक्षेपित होणार्‍या ‘सोनियाचा दिन’ या कार्यक्रमात ही मंडळी गायन सादर करतील. दूरदर्शन निर्मात्या श्रीकला हट्टंगडी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

या कार्यक्रमात पवन नाईक यांच्यासह संजीवनी भेलांडे, आदिती भागवत, अंशुमन विचारे, कीर्ती मेहेंदळे, स्पिपा डान्स ग्रूप, पूजा नायक, धनर्शी प्रधान या कलाकारांचा सहभाग असणार आहे. गायनाच्या मैफिलीत पवन नाईक यांच्या समवेत नगरमधील नादब्रम्‍ह संगीतालयाचे कलाकार कल्याण मुरकुटे (हार्मोनियम), नरेंद्र साळवे (सिंथेसायझर), कुलदीप चव्हाण (बँजो), हर्षद भावे (तबला), निनाद पारखी (सहवादक) हे साथ करणार आहेत. जालिंदर शिंदे, विजय गुणे, डॉ. दीपक जाधव, पंकज शर्मा, विजय जाधव हे सहगायक आहेत. नगरकरांनी या संगीतमय मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन नादब्रrा संगीतालयातर्फे करण्यात आले आहे.

‘नादब्रम्‍हची साथ
‘सोनियाचा दिन’ कार्यक्रमात मराठी गझल व कव्वाली अशी दोन गीते नगरमधील प्रसिद्ध लेखक व कवी डॉ. मुकुंद देवळालीकर यांनी लिहिली आहेत. याला संगीत साज पवन नाईक यांनी चढवला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रक्षेपित होणार्‍या मैफिलीसाठी पवन नाईक यांच्या नादब्रम्‍ह संगीतालयाला सुरेश साळवी, डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, कुमुदिनी बोपर्डीकर, रेवणनाथ भनगडे, शुभांगी मांडे, सतीश आचार्य, शुभलक्ष्मी गुणे, रघुनाथ केसकर, वीणा कुलकर्णी, डॉ. शुभांगी बहुलीकर, डॉ. विकास कशाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.