आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pelting Stone Case : Criminal Booked Against Twele People In Pathardi

दगडफेकप्रकरणी पाथर्डी शहरात बाराजणांवर गुन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुलीची छेड काढण्यावरून मंगळवारी रात्री पाथर्डी शहरात दोन गटांत झालेल्या दगडफेकप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील बाराजणांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री चिंचपूर रस्त्यावर दोन गटांत दगडफेक झाली. या घटनेनंतर एका गटाच्या महिलांनी पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून छेड काढणार्‍या तरुणाला तातडीने अटक करण्याची मागणी केली, तर दुसर्‍या गटातील तरुणांनी प्रार्थनास्थळावर दगडफेक झाल्याचा आरोप करत या घटनेतील आरोपींना अटक करा या मागणीसाठी मोर्चा काढण्याची तयारी केली. पोलिसांनी समजूत काढल्याने हा मोर्चा रद्द करण्यात आला. घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक गणेश राठोड, तसेच शीघ्रकृती दलाचे पथक शहरात दाखल झाले. रात्री उशिरा जिल्हा पोलिसप्रमुख रावसाहेब शिंदे आले. पोलिस नाईक बाबासाहेब आसाराम गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेत एक रिक्षा व टेम्पोचे नुकसान झाले.