आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pending Bids At Various Demonstrations For Young Kindergarten

विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांची निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-सरकारने 2005 व 2008 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पेन्शन देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापि निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या सेवाशर्ती ठरवण्यासंबंधी महिला व सबलीकरण समिती नेमली होती. या समितीने 10 ऑगस्ट 2011 रोजी लोकसभेत अहवाल सादर केला. त्यात मानधन ठरवण्यासाठी स्थायी यंत्रणा असावी, महागाई भत्ता व वार्षिक मानधन वाढ द्यावी, त्याबरोबरच फंड देण्याचीही तरतूद असावी अशा शिफारशींचा समावेश होता. आजारपणाची रजा, बालवाडीची सेवा ग्राह्य धरणे, अंगणवाड्यांचे खासगीकरण करू नये, उन्हाळ्याची सुटी मिळणे आदी संघटनेच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी राजेंद्र बावके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो महिला जिल्हा परिषदेसमोर एकत्र आल्या होत्या.

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली.

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका 6 जानेवारीपासून संपावर आहेत. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.