आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pending Crime Solve Immediately : Director General Dhanjay Kamlakar

प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करा : महानिरीक्षक धनंजय कमलाकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करण्याची सूचना पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांनी सोमवारी केली.

यापूर्वी चार वेळा लांबणीवर पडलेली वार्षिक तपासणी अखेर सोमवारी सुरू झाली. पोलिस मुख्यालयात झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत कमलाकर बोलत होते. पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनिता साळुंके व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शहर व उपनगरातील धूमस्टाईल चोर्‍यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या पोलिसांबद्दल कमलाकर यांनी नाराजी व्यक्त केली. आलेल्या सर्व तक्रारी नोंदवून घेऊन तपासावर अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी दिली. आगामी धार्मिक सण लक्षात घेऊन आतापासून सज्ज राहण्याच्या व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तत्पूर्वी पोलिस मुख्यालय मैदानावर परेडची पाहणी कमलाकर यांनी केली.

मुक्काम होगानसच्या विश्रीमगृहावर
महानिरीक्षक कमलाकर होगानस कंपनीच्या विश्रीमगृहावर मुक्कामाला आहेत. शासकीय विश्रीमगृह, तसेच पोलिसांचे वसंत कीर्ती हे विश्रामगृह उपलब्ध असताना एका कंपनीच्या खासगी विश्रीमगृहावर मुक्काम कशासाठी, अशी चर्चा सुरू होती. महत्त्वाच्या कामात शासकीय विश्रीमगृहावरच्या गर्दीचा अडथळा होऊ नये, यासाठी ही वेगळी व्यवस्था असल्याचे बोलले जात आहे.