आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख पळवणाऱ्या चोरांना जमावाने बदडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कामगारांच्या पगारासाठी ठेकेदाराने काढलेले अडीच लाख रुपये धूमस्टाईल पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी मोठ्या शिताफीने पकडून चांगला चोप दिला. कापडबाजारात शनिवारी दुपारी हे थरारनाट्य घडले. पकडलेल्या दोन्ही चोरट्यांना नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

केडगाव येथील मोहिनीनगर भागात राहणारे ठेकेदार बाबुराव बडे यांनी कामगारांच्या पगारासाठी मार्केटयार्ड येथील मर्चंट बँकेतून अडीच लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम पिशवीत ठेवून त्यांनी ती पत्नीकडे दिली. दोघे कापडबाजाराकडे येत असताना पाठीमागून मोटासायकलीवरून (एम. एच. १६ डी. एस. ५१०९) आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याकडील पिशवी हिसकावली. बंगाल चौकीजवळील डॉ. वाळिंबे हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. बडे यांनी प्रसंगावधान राखून चोरट्यांचा पाठलाग केला. कापडबाजाराकडे पळालेल्या चोरट्यांनी रहदारीत आडव्या आलेल्या दोन महिलांना ढकलून दिले. त्यामुळे परिसरात आरडाओरड सुरू झाली. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला.