आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावर भाषणाला पीपल्स हेल्पलाइनचा विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - धार्मिक स्थळाचा दुरुपयोग प्रतिबंधक कायदा १९८८ च्या तरतुदीनुसार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित करत, दसऱ्याला होणाऱ्या भगवान गडावरील मेळाव्यास पंकजा मुंडे यांना भाषणासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने विरोध दर्शवला आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी देऊ नये; अन्यथा जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत औरंगाबाद खंडपीठात प्रशासन सरकार विरोधात दाद मागू, असा इशारा संघटनेने दिला आहे. 
 
ग्रामीण विकास खात्यात तीन वर्षांपासून पंकजा मुंडे मंत्री आहेत. मात्र, या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामे झाली नाही. ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. १९६४ ग्रामदान कायद्याचा वापर करून राज्यात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून घरकुल वंचितांसाठी घरे बांधता आली असती. मात्र, यामध्ये पुढाकार घेता राजकीय हित साधण्यासाठी दसरा मेळाव्याच्या भगवान गडावरून भाषण करण्यात मुंडे यांना स्वारस्य वाटत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. धार्मिकस्थळाचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यानिमित्त भगवान गडावरील सभेवरून मोठे वादंग निर्माण झाले होते. धार्मिक स्थळाचा दुरुपयोग प्रतिबंधक कायदा १९८८ च्या तरतुदीनुसार पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने करण्यात आली. भगवान गडाचा वापर राजकीय सभेसाठी होऊ नये, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. निवेदनावर अॅड. गवळी, कॉम्रेड बाबा आरगडे, प्रकाश थोरात, अॅड. लक्ष्मण पोकळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे आदींची नावे आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...