आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशेच्या नोटा दाखल; जनतेच्या हाती मात्र ठेंगा!‌

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नोटबंदीच्या चार आठवड्यांनंतरही एटीएममध्ये चलनाचा तुटवडा कायम आहे. सर्वांनाच केवळ प्रतीक्षा असलेल्या नव्हे, तर तातडीची गरज बनलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या नोटा नगर जिल्ह्यात दाखल झाल्याचा दावा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापनाने केला असला, तरी बँकांनी मात्र पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आल्या नसल्याचे सांगितल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबरला पाचशे हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर बँकांतील व्यवहार दुप्पटीने वाढले आहेत. विविध राष्ट्रीयीकृत खासगी बँकांमध्ये आतापर्यंत दोन हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे. नोटाबंदीच्या तीन आठवड्यानंतरही बँकींग सेवा पुर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. बँकांतून नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबल्याने गेल्या आठवड्यात बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी झाली होती. नोकरदारांचे पगार बँक खात्यात जमा होऊ लागल्याने सर्वच बँकांत पुन्हा गर्दी होऊ लागली.

सध्या बँकांमधून नव्या दोन हजारांच्या नोटा दिल्या जात अाहेत. त्यामुळे दोन हजारांच्या सुट्यांचा वांधा झाला आहे. बँकांनी नोटांची शंभर टक्के मागणी केल्यानंतर केवळ २० टक्के नोटाच बँकांना मिळत असल्याने चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आल्याचा दावा अग्रणी बँकेचे व्यवस्थापन राजेंद्र दायमा यांनी दिव्य मराठी शी बोलताना केला. याबाबत बँकांशी संपर्क साधला असता बँकांनी आमच्यापर्यंत या नोटा आल्याच नसल्याचे सांगतिले आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. सध्या काही बँकांमधून पाचशे रुपयांऐवजी शंभर, दहा वीस रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. काही बँकांत केवळ दोन हजारांच्या नोटा असल्याने ग्राहकांना दोन हजारांच्याच नोटा काढाव्या लागत आहेत. त्यातही सेवानिवृत अधिकारी-कर्मचारी, बचतगट यांचे बँक खाते हे राष्ट्रीयीकृत बँकांत आहे.

तेथे कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण त्यातच नोटांचा तुटवडा, यामुळे काम करताना कर्मचाऱ्यांना तारेवरची करसत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी एटीएम बाहेर कॅश शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आल्याने ग्राहकांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने गेल्या आठवड्यातच ३४४ एटीएम सेवा सुरळीत झाल्याचा दावा केला होता, मात्र तो फोल ठरला आहे. पेट्रोलपंपावर ही दोन हजारांच्या सुट्टे मिळत नसल्याने ग्राहकांना किमान २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल टाकून उर्वरित सुट्टे घ्यावे लागत आहेत. काही पेट्रोलपंपावर सुट्टे नसल्यामुळे ग्राहकांना पेट्रोल टाकताच जावे लागत आहे.

कॅशलेसवर भर
पाचशे रुपयांच्या नव्या नोटा आल्या आहेत. सध्या चलनाचा तुटवडा आहेच. आम्ही कॅशलेस व्यवहारावर भर देत आहोत. त्यासाठी शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आठवडाभरात बँकिंग एटीएम सेवा सुरळीत होईल.'' - राजेंद्रदायमा, व्यवस्थापक, अग्रणी बँक.
बातम्या आणखी आहेत...