आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • People Protest Against The Killing Of Five Indian Army Soldiers By Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौकाचौकांत जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाकिस्तानी सैन्याने घुसखारी करून भारतीय लष्कराच्या गस्तीपथकावर केलेल्या हल्ल्याचा बुधवारी नगर शहर शिवसेनेसह भाजीविक्रेते व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र निषेध नोंदवला. शिवसैनिकांनी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली चौकाचौकांत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली.

शिवसेनेसह विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी सकाळी माळीवाडा वेस, भिंगारवाला चौक, सज्रेपुरा, चौपाटी कारंजा, केडगाव वेस, प्रोफेसर कॉलनी चौक, बोल्हेगाव, कायनेटिक चौक, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली. प्रोफेसर कॉलनी चौकात निषेध नोंदवताना आमदार राठोड म्हणाले, देशाचे रक्षण काँग्रेस पक्ष करू शकत नाही. ‘काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ’ अशी परिस्थिती असल्याने देश संकटात सापडला आहे. त्यामुळे या पक्षाला देशाचा स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा काहीही अधिकार नाही. पाकिस्तान व चीन ही दोन्ही शत्रूराष्ट्रे हातात हात घालून भारताची प्रगती रोखत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर देशाचे राष्ट्रपती असते, तर अध्र्यापेक्षा अधिक पाकिस्तान भारतीय लष्कराने जाळले असते. काँग्रेसच्या राजवटीत मात्र देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, दिगंबर ढवण, दशरथ शिंदे, अर्जुन दातरंगे, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी आदी उपस्थित होते.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी न्यू आर्टस्च्या प्रवेशद्वारासमोर शहीद जवानांना र्शध्दांजली वाहून पाकिस्तान सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत 17 वेळा घुसखोरी केली, तरीही भारत सरकार ठोस पाऊल उचलत नाही. उलट हे हल्ले दहशतवादी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. सरकारने ठोस कारवाई केली नाही, तर देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी निखिल शिंदे, श्रीकांत कुटे, दत्ता लोहकरे, योगेश धाडगे, सचिन चौगुले, किशोर कांबळे, अमित गाडे, वर्षा बोरूडे, उज्‍जवला पवार, दर्शना मार्कंडेय आदी उपस्थित होते.