आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळाच्या अावर्तनासाठी निर्णयाची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खरीप पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी मुळा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय मंगळवारी अपेक्षित होता. मात्र, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचे केवळ आश्वासन मिळाले. पाणी सोडण्याच्या आदेशाकडे लाभक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बैठकीला पालकमंत्री राम शिंदे, अामदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अधिकारी लाेकप्रतिनिधी उपस्थित होते. तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. मात्र, आवर्तनासाठी आवश्यक साडेचार टीएमसी पाणी धरणात उपलब्ध नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. पाणी कमी असले, तरीही आवर्तन सोडण्याचा आग्रह धरल्याची माहिती आमदार मुरकुटे यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती लक्षात घेता आवर्तनाबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.