आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबपुष्प कोरा कागद देऊन मागणार आयुक्तांचा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अकार्यक्षम नोकरशाहीची सतत प्रचिती येत असल्याने काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने कोरा कागद सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. कायद्याप्रमाणे नागरिकांचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प कोरा कागद देऊन राजीनामा देण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती प्रकाश थोरात यांनी दिली. संघटनेच्या वतीने लवकरच मनपा आयुक्त दिलीप गावडे यांना कोरा कागद गुलाबपुष्प देऊन राजीनामा देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

शहरात नागरी सुविधा पुरवण्यात आयुक्त असक्षम ठरले. शहरातील सर्व रस्ते खड्डेमय धुळीने माखलेले आहेत. अस्वच्छतेमुळे अनेक भागात साथीचे आजार पसरले आहेत. वृक्षारोपण, पंतप्रधान आवास योजना राबवण्यास ते असमर्थ ठरले असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, निरोप समारंभ ठेवण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना काम करून घेण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेक चकरा मारावे लागतात. नियमाप्रमाणे काम होणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक काम टाळले जाते.

शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे रेंगाळली जात असल्याने, कामासाठी पैशांची अपेक्षा केली जात आहे. अनेक कामामध्ये टक्केवारीची पद्धत रूढ झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांचा राजीनामा मागण्यासाठी कोरा कागद गुलाबपुष्प देऊन त्यांचा निरोप समारंभ केला जाणार असल्याचे अॅड. कारभारी गवळी यांनी पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...