आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peoples Republican Party With Congress Says Jogendra Kawade

पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेसबरोबर : कवाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीने प्रस्ताव ठेवल्यास पाठिंब्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पक्षाने घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांनी त्यास दुजोरा दिला.

भाजप-शिवसेना युतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले सहभागी झाले आहेत. त्यामुळे दलित मतांचा फायदा महायुतीला होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शुक्रवारी नगर दौर्‍यावर आलेल्या कवाडे यांनी मात्र काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा मनोदय ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. महायुतीकडून आठवले, तर काँग्रेस आघाडीकडून पीपल्स रिपब्लिकन पक्ष असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

कवाडे म्हणाले, महायुतीचा फुगा जाणीवपूर्वक फुगवला जात आहे. आठवले महायुतीत असले, तरी सुजाण दलितांच्या मतांवर त्याचा परिणाम होणार नाही. सध्या देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. घोटाळ्यांतून वाचण्यासाठी लोकशाही बळकट करण्याची गरज आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्ष परिवर्तनासाठी राजकीय वाटेवर निघाला आहे. अकोले येथे नुकत्याच झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्यात लोकसभेच्या 5, तर विधानसभेच्या 51 जागा स्वबळावर लढवण्याबाबत विचार झाला. तथापि, काँग्रेस आघाडीने सन्मानजनक प्रस्ताव ठेवल्यास आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत.

यवतमाळ पोटनिवडणुकीत आमच्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या गटबंधनाचा मार्ग प्रशस्त आहे. राज्यपातळीवरील नेत्यांशी चर्चा झाली असून आता हायकमांडच्या संपर्कात आहोत, असे कवाडे म्हणाले.