आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पाणी योजनेपेक्षा 'परमिटरुम' महत्त्वाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातून जाणारे आठ राज्य राष्ट्रीय महामार्ग ताब्यात घेण्यास विरोधक सत्ताधारी नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या महासभेत नकार दिला. नगरसेवकांच्या विरोधामुळे महामार्ग ताब्यात घेण्याचा विषय महापौर अभिषेक कळमकर यांनी अखेर रद्द केला. महामार्गावरील हॉटेल परमिटरूमचालकांपेक्षा 'फेज टू'चा विषय महत्त्वाचा आहे. वेळोवळी पत्रव्यवहार करूनही 'फेज टू'वर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सभा बोलावण्यात आली नाही. हॉटेल परमिटरूमचालकांनी मात्र एक पत्र देताच महामार्ग ताब्यात घेण्याचा विषय सभेसमोर मांडण्यात आला, ही शोकांतिका असल्याच्या कानपिचक्या नगरसेवकांनी महापौर प्रशासनाला दिल्या.
महापौर कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्याने शहरातून जाणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले महामार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु या विषयाला विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. सत्ताधारी नगरसेवक तथा सभागृह नेते कुमार वाकळे यांनी सुरूवातीलाच या विषयाला विरोध दर्शवला. महामार्ग ताब्यात घेतल्यास अतिक्रमणांचा प्रश्न सुटण्याएेवजी तो अधिक गंभीर होणार असल्याचे वाकळे यांनी सांिगतले. महामार्ग ताब्यात घेतल्यास उड्डाणपुलाच्या कामास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्र राज्य शासनाकडून महामार्गांसाठी मिळणारा निधी परत जाण्याची भीती असल्याचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले, शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणी योजनेबाबत (फेज टू) चर्चा करण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलावण्यात यावी, यासाठी आतापर्यंत अनेकदा पत्र दिले. परंतु या विषयासाठी अद्याप सभा बोलावण्यात आलेली नाही. महामार्गांवरील हॉटेल परमिटरूमचालकांनी मात्र एक पत्र देताच महामार्ग ताब्यात घेण्याचा विषय तत्काळ सभागृहात ठेवण्यात आला. "फेज टू'पेक्षा आता हॉटेल परमिटरूमचालकांचा विषय महत्त्वाचा झाला आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी महापौर प्रशासनाला कानपिचक्या दिल्या.
ज्येष्ठ नगरसेवक अॅड. अभय आगरकर, दीप चव्हाण, िकशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे आदींनीही या विषयाला विरोध दर्शवला. त्यामुळे महापौर कळमकर यांनी महामार्ग ताब्यात घेण्याचा विषय रद्द केला. अजेंड्यावरील इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले.
अॅम्युझमेंट पार्कला मंजुरी
सावेडीतीलगंगा उद्यानामागील एकर २० गंुठे जागेवर बीओटी (बांधा, वापरा हस्तांतरित करा) तत्त्वावर अॅम्युझमेंट पार्क उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा विषय सभेसमोर मंजुरीसाठी होता. या निर्णयाचे सर्वच नगरसेवकांनी स्वागत केले. ज्येष्ठ नगरसेवक अॅड. अभय आगरकर यांनी अॅॅम्युझमेंट पार्कऐवजी स्विमिंग पूल बांधण्याची सूचना केली. स्विमिंग पूलच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करत स्विमिंग पूल इतर ठिकाणी करू, असे महापौर कळमकर यांनी स्पष्ट करत अॅॅम्युझमंेट पार्कसाठी मंजुरी दिली.
जॉगिंग ट्रॅकचे नामकरण
सावेडीउपनगरातील प्रोफेसर कॉलनीतील जॉगिंग ट्रॅकच्या नामकरणास सभागृहाने मंजुरी दिली. या जॉगिंग ट्रॅकला क्रीडा संघटक (कै.) मेजर दिनूभाऊ कुलकर्णी यांचे नाव देण्याचा विषय यापूर्वीच सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु महापौर अभिषेक कळमकर यांनी हा विषय तहकूब ठेवला होता. बुधवारी झालेल्या सभेत नामकरणाचा मुद्दा समोर येताच महापौर कळमकर यांनी जॉगिंग ट्रॅकला कुलकर्णी यांचे नाव देण्यास मंजुरी दिली. वाडिया पार्कला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.
या प्रमुख विषयांना मंजुरी
>केडगावमधीलमहिला जीमला 'जिजामाता महिला जीम' नाव देणार
>केडगाव येथील मोकळा भूखंड पारनेर परिवार मित्र मंडळाला मिळणार
>वसंत टेकडी येथे ११ केव्ही एक्स्प्रेस फीडरसाठी महावितरणकडे पैसे भरणे
>राजेश्वर महिला प्रतिष्ठानला केडगाव येथील मोकळा भूखंड देणे
>शहर उपनगरांतील स्वच्छतेच्या अंमलबजावणीचा विषय प्रत्येक महिन्याच्या सभेच्या अजेंड्यावर घेणे
हत्ती कशाला पोसायचा?
बातम्या आणखी आहेत...