आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवाने निलंबित, तरी गाळप सुरूच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या वर्षीचा एफआरपी (उचित किफायतशीर दर) थकीत असलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देतानाच साखर आयुक्त कार्यालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे थकीत रक्कम एक महिन्याच्या आत देण्याची हमी घेतली होती. गाळप सुरू झाल्यानंतर महिनाभराच्या आत थकीत रक्कम देणे क्रमप्राप्त होते. मात्र, गाळप सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर आयुक्तांनी संबंधितांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले. हे आदेश केवळ कागदोपत्री ठरले. कारवाई केलेल्या पाचही कारखान्यांचे गाळप बिनदिक्कत सुरू आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील १८ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला. तत्पूर्वी गाळप परवान्यासाठीच्या प्रस्तावांसोबतच कारखान्यांकडून गेल्या वर्षीची थकबाकी अदा करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले होते. गाळप सुरू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत थकीत रक्कम अदा करण्याची हमी या प्रतिज्ञापत्राद्वारे कारखानदारांनी दिली होती. हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यांकडे गेल्या वर्षीचा एफआरपी थकीत होता. परंतु यातील तीन कारखान्यांनी प्रतिज्ञापत्रानुसार एफआरपी अदा केला. सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या हिरडगावच्या साईकृपा कारखान्याने यंदाचा गाळप हंगामच घेतला नाही. साईकृपा कारखान्याकडे सुमारे ३८ कोटींचा एफआरपी थकीत होता. साखर आयुक्तांनी कारखाना जप्तीचे आदेश देऊनही गेल्या दोन महिन्यांत केवळ कोटींची थकबाकी कमी होऊ शकली. अजूनही साईकृपाकडे ३० कोटी ३० लाखांचा एफआरपी थकीत असून रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलने सातत्याने सुरू आहेत.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री डॉ. विखे सहकारमहर्षी थोरात कारखान्याकडे गेल्या हंगामातील एफआरपी हंगामाच्या सुरुवातीपासून थकीत आहे. विखे कारखान्याकडे गेल्या वर्षीचे कोटी ६६ लाख, तर थोरात कारखान्याकडे १२ कोटी ११ लाख थकीत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अधिपत्याखालील अगस्ती कारखान्याकडे कोटी, माजी आमदार भाजपचे राजीव राजळे यांच्या वृद्धेश्वर कारखान्याकडे कोटी, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या अधिपत्याखालील प्रसाद कारखान्याकडे कोटी ३७ लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे साखर आयुक्तांनी या पाचही कारखान्यांचे परवाने निलंबित करण्याचा आदेश ११ जानेवारीला दिला. जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचा ३२ कोटी १७ लाखांचा एफआरपी अडवून ठेवला आहे. विलंबाने झालेल्या कारवाईतून तरी थकीत रक्कम लवकर मिळावी, अशी अपेक्षा संबंधित ऊस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

कारवाईनंतर गाळप सुरू ठेवल्यास प्रतिटन गाळपास ५०० रुपये दंड आकारण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. मात्र, या पाचही कारखान्यांचे गाळप आदेशानंतरही सुरूच आहे. प्रसाद कारखान्याच्या प्राजक्त तनपुरे यांनी थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली असली, तरी रक्कम जमा झालीच नसल्याचे साखर आयुक्तांच्या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. आयुक्तांनी हिरडगाव येथील साईकृपा कारखाना जप्तीचे आदेश देऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना थकीत एफआरपी देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. अशा परिस्थितीवर दिग्गजांच्या कारखान्यावर केलेली कारवाई केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यंदाही निर्णय धाब्यावर
जिल्ह्यातील१८ साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत २६ लाख ९० हजार टन उसाचे गाळप केले. या उसाचा एकूण एफआरपी ७२३ कोटी रुपये होतो. यातील १०३ कोटी वाहतूक तोडणी खर्च वगळता ५७५ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अदा करणे आवश्यक होते. मात्र, या कारखान्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत २९७ कोटी ५० लाख रुपयेच अदा केले आहेत, तर २७७ कोटी २९ लाख रुपये थकीत आहेत. एकूण एफआरपीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा थोडी अधिक रक्कम ऊस उत्पादकांना अदा करण्यात आली आहे. वास्तविक पहिल्या टप्प्यात कारखान्यांनी किमान ८० टक्के रक्कम अदा करणे अपेक्षित होते.

'ज्ञानेश्वर'ची आघाडी
यंदाच्याहंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४७ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यातून ४९ लाख ३२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.१५ पर्यंत पोहोचला आहे. ज्ञानेश्वर साखर कारखान्याने एफआरपी अदा करण्यात आघाडी घेतली असून १५ डिसेंबरपर्यंत गाळप उसाला या कारखान्याने पहिल्या टप्प्यात एकूण एफआरपीच्या ८३ टक्के रक्कम अदा केली आहे. सर्वाधिक लाख ९० हजार टन उसाचे गाळप करणाऱ्या अंबालिका या खासगी कारखान्याने यंदाच्या गाळपातील उसाचा एक रुपयाही एफआरपी अजून दिलेला नाही.