नगर - "दिव्य मराठी'च्या मधुरिमा परिवारतर्फे घेण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत सर्व सभासदांसाठी सौंदर्यविषयक "पर्सनल ग्रुमिंग' कार्यशाळेचे बुधवारी (१० डिसेंबर) दुपारी २. ३० वाजता टिळक रस्त्यावरील हॉटेल राज पॅलेसमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सौंदर्य हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याची वृद्धी व निगा, तसेच विविध प्रकारचे मेकअप, साडी ड्रेपिंग, त्वचा व केसांची निगा याविषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत शहरातील संध्यादीप ब्यूटिपार्लरच्या संचालिका डॉ. दीपा भागवत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. ज्या महिलांना सभासद नोंदणी करायची असेल, त्यांनी अडीचशे रुपये भरून कार्यक्रमाच्या ठिकाणी नावनोंदणी करावी, ज्यांना केवळ कार्यशाळेचा लाभ घ्यायचा असेल, अशा महिलांना पाचशे रुपये भरून कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. या कार्यशाळेचे प्रायोजक नावीन्य कलेक्शन व स्मार्ट लेडीवेअर हे आहेत. "मधुरिमा'च्या महिला सदस्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन "मधुरिमा'च्या अंजली भगत- निक्रड यांनी केले आहे.