आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील साडेचार हजार पेट्रोल डीलर संपात सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी "सीआयपीडी' "फामपेडा' या पेट्रोल डीलर्स संघटनांनी ११ एप्रिलपासून देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. तीन टप्प्यांत आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून २७ एप्रिलपासून बेमुदत इंधनखरेदी बंद करण्याचा पंपचालकांचा निर्धार आहे. या देशव्यापी आंदोलनात "फामपेडा'शी (फेडरेशन आॅफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) संलग्न असलेले सर्व सुमारे हजार ५०० डिलर्स सहभागी होणार आहेत.

ग्राहकांची गैरसोय टळावी, कंपन्यांचा खर्च कमी करून नुकसान कमी व्हावे, यासाठी तीन टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार आहे. ११ एप्रिलला तेलखरेदी १२ तास पंप बंद ठेवला जाईल. १७ १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात पुन्हा तेलखरेदी १२ तास पंप बंद राहतील. मागण्या मान्य झाल्यास २७ एप्रिलपासून बेमुदत तेलखरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

डिलर्सचा नफा ठरवताना कंपन्यांनी मोठी वकि्री गृहित धरली आहे. त्यामुळे पंपचालक, डीलर्सचे नुकसान होत असून नफा ठरवण्याची पद्धती बदलावी, ही मुख्य मागणी आहे. संघटना पदाधकिाऱ्यांनी सर्व पंपचालकांशी संपर्क साधून आंदोलन शंभर टक्के यशस्वी करावे, असे आवाहन कन्सोर्टिअम आॅफ इंडियन पेट्रोलियम असोसिएशन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
-"अपूर्वचंद्रसमिती'च्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी.
-पंपावरील सेवा सुविधा (हवा, टायर, इतर) सशुल्क कराव्यात.-नफा ठरवताना १९९७ च्या नेट फकि्स अॅसेटचा आधार अद्ययावत करावा.
-देशात ५३ हजार पंप असताना ३३ हजार नव्या डीलर्सची नेमणूक ऑईल कंपन्या करू पाहत आहेत. त्यासाठी नवीन डीलर्सना १०० किलोच्या सेल्ससाठी जाहिराती काढून फसवले जात आहे. इतक्या कमी सेल्समध्ये पंप चालवणे परवडत नाही. त्यामुळे नवीन नेमणुका ताबडतोब थांबवाव्यात.
-बाहेर पडू इच्छिणाऱ्या डीलर्सना त्यांच्या जमिनी परत ताब्यात देण्याचे धोरण आखावे.
-सध्या खासगी स्पर्धकांना (रिलायन्स एस्सार) कोणतीही "मार्गदर्शक संहिता' लागू नाही. नकिोप स्पर्धेसाठी सरकारी मार्गदर्शक संहिता रद्द करावी.
-पेट्रोल पंपावरील सुरक्षितता, देखभालीसह ग्राहकांसाठी वापर मर्यादित करण्यास परवानगी मिळावी. मार्गदर्शक संहितेअंतर्गत खाजगी पंपांवर दंडात्मक कारवाई करावी.
-ऑईल कंपन्या मोठ्या डीलर्सना हाताशी धरून "लायसन्स एरिया'बाहेर छोट्या टँकरमधून डिझेल वकि्री करण्यास प्रवृत्त करत आहेत. ही बेकायदेशीर वकि्री बंद करावी.
-पंपावर येणारा स्टॉक हा फ्लो मीटरने ताब्यात मिळावा. जुनी कालबाह्य पद्धत रद्द करावी.
-दर महिन्याच्या १६ तारखांनाच वकि्री दरातील चढउतार करण्याचे ठरले आहे. तसे वचन ऑईल कंपन्यांनी दिले आहे. पण, या तारखा वगळून बदल होत असल्यामुळे डिलर्सचे आर्थकि नुकसान होते. त्यामुळे बदलाच्या तारखांमध्ये सातत्य शिस्त आणावी.
-कुटुंबातील सदस्यांमध्ये डिलर्सशिपच्या मालकीविषयी बदल करायचा असल्यास ती पद्धत सोपी करून त्यावर फी आकारू नये.
-रस्तारुंदीकरण, पूल, अशा कारणांनी आपतग्रस्त झालेल्या डिलर्सचे पुनर्वसन करावे.
आता नकिराचा लढा
केंद्र सरकार तेल कंपन्यांनी पेट्रोलपंप डीलर्सच्या मागण्यांना आजवर केराची टोपली दाखवली आहे. मुक्त वातावरण नसल्यामुळे डीलर्स मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे यावेळी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार आहे. आंदोलन १०० टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसे झाले तरच लढा यशस्वी होईल.''
उदय लोध, अध्यक्ष,फामपेडा संघटना.