आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Architects News In Marathi,Pictures Architects Pramod Kambale News In Marathi

चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांना कलेची ईश्वरदत्त देणगी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रमोद कांबळे यांना ईश्वरानेच कलेची देणगी दिली आहे. कलाकार खूप आहेत, पण कांबळे यांच्या कलेची पातळी अतिशय उच्च आहे. त्यांनी साकारलेल्या शिल्पकृतींच्या डोळ्यांतील हावभाव सूक्ष्म व बोलके अहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या चित्र व शिल्पकृतींचे कौतूक केले.
कांबळे यांनी अण्णांची फायबर ग्लासची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीच्या हातात राष्ट्रध्वज आहे. ही मूर्ती, तसेच कांबळे यांच्या शिल्प व चित्रकृती पाहण्यासाठी अण्णांनी कांबळे यांच्या स्टुडिओला भेट दिली. कांबळे यांनी आपले सर्व कलाविश्व अण्णांसमोर उलगडून दाखवले. फायबर ग्लासच्या साह्याने अत्यंत हुबेहूब अशा कलाकृती कांबळे यांनी घडवल्या आहेत. त्यात देव-देवतांपासून, संत, नेते, वन्यप्राणी, पक्षी यांचा समावेश आहे. आधी या मूर्ती शाडूच्या मातीपासून घडवाव्या लागतात. नंतर त्यांचे साचे तयार करून मग फायबरच्या मूर्ती तयार होतात. फायबर ग्लासपासून बनवलेल्या कलाकृतींचा टिकाऊपणा सर्वाधिक असतो. त्यांच्यावर वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही, हे सांगितल्यावर अण्णा अतिशय प्रभावित झाले. सर्व कलाकृती अतिशय बारकाईने पाहून त्यांनी कांबळे यांच्या कलेला दाद दिली. ते म्हणाले, की मुळातच आपल्या देशात कलेला फारसा वाव मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. लहान वयातच कलेचे संस्कार झाले, तर देशात कांबळेंसारखे अनेक कलाकार तयार होतील. कांबळे यांचे कलाविश्व इतके मोठे आहे, याची कल्पना नव्हती. कांबळे तरुण कलाकार घडवत आहेत, ही बाब खूप चांगली आहे.कांबळे यांनी आपल्या कुटुंबाची चौथी पिढी शुभंकरच्या रूपाने कलाक्षेत्रात कार्यरत झाल्याचे सांगितले. यावेळी शुभंकर यांनीही घडवलेली शिल्पे व चित्रे अण्णांनी पाहिली.
साईंची 108 फूट मूर्ती घडवणा
नगरमध्ये मोठे उद्योग नाहीत. व्यापारपेठही लयास चालली आहे. अशा स्थितीत पर्यटनातूनच शहराचा विकास होणार असल्याचे स्पष्ट करून पर्यटन विकासासाठी आपण 108 फूट उंचीची साईबाबांची मूर्ती उभारणार असल्याचे कांबळे यांनी अण्णांना सांगितले. या मूर्तीखाली भव्य हॉल असेल. त्यात साईबाबांच्या जीवनावरील प्रसंग साकारले जातील, शिर्डीला येणार्‍यांपैकी 20 टक्के भाविक जरी हे शिल्प पाहण्यासाठी नगरमध्ये आले, तर नगरच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागेल. त्यासाठी जागेच्या शोधात असल्याचे ते म्हणाले.
चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या पत्नी स्वाती यांनी ध्यानस्थ बसलेल्या संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट देऊन अण्णा हजारे यांचा सत्कार केला. अण्णांना ही मूर्ती खूप आवडली. ते म्हणाले, माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, पण अवघ्या देहावरच मी तुळशीपत्र ठेवले आहे..
‘अहमदनगर टुरिझम रिव्हॉल्युशन
अहमदनगर टुरिझम रिव्हॉल्युशन या चळवळीची माहिती स्वप्नील मुनोत यांनी अण्णांना दिली. या चळवळीद्वारे नगरची ओळख जागतिक पातळीवर नेऊन पर्यटनाला चालना देणार असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, पाचशे वर्षांपूर्वी नगर जगात तिसर्‍या क्रमांकाचे शहर होते, हे नगरकरांना माहिती नाही. शहराला उजिर्तावस्था आणण्यासाठी बाहेर गेलेले अनेक तरुण नगरमध्ये परत येऊन प्रयत्न करत आहेत. बाहेर मिळणार मोठा पैसा नाकारून शहरासाठी योगदान देणार्‍या या तरुणाईचे अण्णांनी कौतुक केले.
_______________________________________