आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळगाव पाणी योजना शहरासाठी पर्यायी व्यवस्था, अहवाल तयार करण्याच्या सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराची वाढती लोकसंख्या व अनियमित पाऊस या पार्श्वभूमीवर पिंपळगाव माळवी पाणी योजनेचा शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वापर करता येईल. त्यासाठी योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करा, अशा सूचना महापौर शीला शिंदे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

आमदार अनिल राठोड व महापौरांनी शुक्रवारी पिंपळगाव पाणी योजनेची पाहणी केली, त्यावेळी महापौरांनी या सूचना दिल्या. याप्रसंगी उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, यंत्र अभियंता परिमल निकम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक संभाजी कदम, अनिल लोखंडे, संजय शेंडगे, नितीन जगताप, गणेश कवडे, अनिल शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, पिंपळगाव माळवी तलाव मनपाच्या मालकीचा असून या ठिकाणी मनपाची सातशे एकर जमीन आहे. पूर्वी शहरासाठी येथूनच पाणीपुरवठा करण्यात येत होता. शहराची वाढती लोकसंख्या व अनियमित पाऊस यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या योजनेचा विचार करता येईल. तलावातील गाळ काढल्यास मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य होणार आहे. पिंपळगाव माळवी ते वसंत टेकडी हे अंतर केवळ 12 किलोमीटर असून पाइपलाइन टाकणे शक्य होणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून योजनेचा वापर झाल्यास मनपाच्या वीजबिलातही मोठी बचत होईल. त्यासाठी या पाणी योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.