आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळगावच्या जागेवर अहमदनगर मनपाचे नावच नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी पिंपळगाव माळवी येथील 698 एकर जागा संपादित करण्यात आली होती. त्यासाठी नगरपालिकेने त्या वेळी 7 लाख 14 हजार रुपये खर्च केले, पण अजून या जागेवर महापालिकेचे नाव लागलेले नाही.

नगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1915 मध्ये पिंपळगाव माळवी येथे तलाव बांधण्यात आला. तलावासाठी नगर तालुक्यातील जेऊर व पिंपळगाव माळवी येथील 698 एकर जागा संपादित करण्यात आली. त्यापोटी तत्कालीन पालिकेने 7 लाख 14 हजार रुपये खर्च केले. पण या जागेचा सातबारा उताराच उपलब्ध नाही.

महापालिकेकडे हस्तांतरित न झालेल्या जागांवर मनपाचे नाव लावण्यासाठी निवृत्त तहसीलदारांची समिती काम पाहत आहे. पिंपळगाव माळवी तलावाच्या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी मनपा प्रशासनाने 2009 मध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्हा प्रशासनाने आणखी कागदपत्रांची माहिती मागवली. त्यानुसार त्रुटींची पूर्तता करून नव्याने 9 ऑगस्ट 2011 मध्ये फेरप्रस्ताव पाठवण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडे हा विषय प्रलंबित असल्याने अद्याप महापालिकेचे नाव पिंपळगाव माळवी तलावाच्या मालमत्तेवर लागलेले नाही. ही जागा उपलब्ध झाल्यास मनपा ती विकसित करू शकते. या माध्यमातून मनपाच्या उत्पन्नात मोठी भर पडेल.