आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळजोडाच्या कामाला हवीय गती, नळजोडणीचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड देण्याचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. परंतु संथ गतीने सुरू असलेल्या या कामास गती देण्याची आवश्यकता आहे. नळजोडणीचे काम पूर्ण होताच केडगाव पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी केडगावमधील नागरिक करत आहेत.
केंद्र शासनाच्या यूअायडीएसएसएमटी अंतर्गत केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी योजनेचे (फेज १) काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड स्थलांतरित करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ठेकेदार संस्थेने हे काम बंद केले होते. जोपर्यंत झालेल्या कामाची बिले मिळत नाहीत, ताेपर्यंत काम सुरू करण्याचा पवित्रा ठेकेदार संस्थेने घेतला होता. मनपा प्रशासन महापौर सुरेखा कदम यांनी बंद केलेले काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदार संस्थेला दिले. त्यानंतर नळजोडणीचे काम सुरू करण्यात आले. या कामास गती द्यावी, अशी मागणी केडगावकर करत आहेत. नळजोडाच्या कामासाठी येणारा एक कोटी ४७ लाखांचा खर्च केडगावकरांकडून वसूल करण्यात आला आहे. सुरुवातीला नळजोडाचा हा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. अखेर महापालिकेची अार्थिक स्थिती पाहता हा खर्च नागरिकांनीच करावा, असा ठराव (नागरिकांना विश्वासात घेता) सर्वसाधारण सभेत करण्यात आला. नागरिकांनी नळजोडाचा पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून करावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यानुसार नागरिकांनी नळजोडासाठी मनपाकडे पैसे भरले. परंतु पैसे भरूनही नळजोड मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठेकेदार संस्थेने सुरुवातीला नळजोडाच्या कामास गती दिली. नंतर बिले मिळत नसल्याने हे काम बंद करण्यात आले. सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून हे काम बंद होते.

केडगाव पाणी योजना थोड्याच दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आश्वासन तत्कालीन उपमहापौर सुवर्णा काेतकर यांच्यासह मनपाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिले होते. परंतु त्यांची ही आश्वासने हवेतच विरली आहेत. अनेक दिवसांपासून या योजनेचे काम रखडले होते. तत्कालीन उपमहापौर कोतकर यांनी योजनेच्या कामास गती दिली होती. नळजोडणीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्या. ठेकेदार मनपा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. परंतु आता महापालिकेत सत्तांतर झाल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नळजोडणीचे काम तातडीने पूर्ण करून योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी केडगावचे नागरिक करत आहेत.

योजना पूर्ण होण्याची प्रतीक्षा
सध्या पाणीपुरवठा मोजक्याच भागात होत आहे. नळजोडाचे सर्व काम पूर्ण झाल्याने पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. उर्वरित काम तातडीने पूर्ण करून अनेक वर्षांपासून रखडलेली ही केडगाव पाणी योजना सुरू होणे आवश्यक आहे.

महापौरांनी लक्ष घालण्याची मागणी
मनपा शिवसेना-भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे केडगाव पाणी याेजनेचे काय होईल, अशी शंका नागरिकांना आहे. केडगाव उपनगरात शिवसेनेचा एकच नगरसेवक आहे. महापौर कदम यांनी कोणताही पक्षभेद करता केडगाव पाणी योजनेचे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...