नगर -मनमाड रस्त्यावरील देहरे गावाजवळ एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जवळच असलेल्या रेल्वे मार्गाखालील भरावाची थोडी माती देखील या पाण्याच्या दाबाने वाहून गेली. या मार्गावरून त्यावेळी जाणारी के. के एक्स्प्रेस रेल्वे तातडीने थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर रेल्वे मार्गाची दुरुस्ती केली. त्यानंतर सुमारे तीन तासांनी रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली.
छायाचित्रे: मंदार साबळे, धनेश कटारिया.
पुढे पाहा PHOTOS...