आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेरमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- प्लास्टिकपिशव्यांच्या वापरावर संगमनेरमध्ये कायमस्वरुपी बंदी घालण्यात येणार आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवी बाळगाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले आहे. प्लॉस्टिक बंदीचा नियम मोडणाऱ्यांना एक लाखापर्यंत दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे.
तांबे यांच्या या निर्णयाचे कठोर पालन पालिका प्रशासनाने केले, तर संगमनेरातील पर्यावरणाची प्लास्टिकची समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल. तांबे यांचा निर्णय महत्वपूर्ण असल्याने या निर्णयाचे यश त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. संगमनेरला स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी नगरपालिकेतर्फे विविध योजना राबवल्या जात अाहेत. आरोग्यासाठी अपायकारक प्रदूषण वाढवणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर पालिकेची नजर आता वळली आहे.
नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या, प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढते. आमदार बाळासाहेब थोरात डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या संगमनेरात मोठी बाजारपेठ असल्याने व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे जाणाऱ्या-येणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. व्यावसायिक नागरिक नासकी फळे, कुजलेले मटेरियल, कांदे, अंडी, टरफले, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या असा मोठा कचरा रस्त्यावर टाकतात. हा कचरा गटारीमध्ये जातो. त्यामुळे गटारी तुंबतात. हे थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. भारत आज शिक्षण, अणुशास्त्रात पुढे आहे. परंतु काही गोष्टींची जर नागरिकांनी स्वयंशिस्त लावली, तरच हा देश पुढे जाईल. मी माझे कुटुंब ही स्वार्थीवृत्ती सोडून आपण, आपली गल्ली, रस्ता, कचराकुंडी स्वच्छ कशा राहतील याचा विचार केला पाहिजे. पाणी जपून वापरु कचरा तयार होणार नाही याची एक पध्दती अवलंब करु, असा संकल्प करुन प्लास्टिकचा वापर थांबवून त्याऐवजी कापडी पिशव्या वापरुन शहराला स्वच्छ सुंदर बनवण्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

दंडात्मक कारवाई
प्लास्टिकपिशव्यांचा वापर थांबवण्याकरिता नगरपालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, आयात, पुरवठा विक्री यावर एक लाख रुपये दंड, तर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांतून वस्तू विकल्यास शंभर रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली.
विधायक