आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदान नसलेल्या शाळांमधील मुलांना इथे येईल खेळता...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरातील अनेक शाळांना क्रीडांगण नाही, पण म्हणून तेथील मुलांनी नाराज व्हायचं कारण नाही. मुलांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी महेश बालभवन तयार आहे.
नगर शहरातील नामवंत व सुसज्ज म्हणून ओळखल्या जाणा-या अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, हे लक्षात घेऊन पुण्यातील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळातर्फे नगर शहरातील आरटीओ कार्यालयाशेजारी मुरलीधर सारडा विद्यार्थी भवनाच्या प्रांगणात महेश बालभवन सुरू करण्यात आले.
खो- खो, बास्केट बॉल, रोप स्किपिंग, रोप मल्लखांब, टेबल टेनिस, कराटे, कबड्डी, सूर्यनमस्कार यासह विविध प्रकारचे मैदानी खेळ तेथे शिकवले जातात. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सण व उत्सवांची माहिती वेळोवेळी मुलांना दिली जाते.
खेळण्यासाठी सुमारे 20 हजार चौरस फुटांची दोन मैदाने संस्थेकडे आहेत. त्यांना संरक्षक कुंपण आहे. या शिवाय दोन हजार चौरस फुटांचे दोन हॉल, बगीचा व खेळणी आहेत. रोज सायंकाळी 5 ते 7 या वेळात महेश बालभवन सुरू असते. पुण्यात 21 वर्षांपूर्वी महेश बालभवनचे रोपटे लावले गेले. संस्थेच्या कोथरूड येथील क्रीडांगणावर सध्या ते 1500 मुले-मुली रोज सायंकाळी खेळण्यासाठी येतात. बाराही महिने हा उपक्रम सुरू असतो.

आता रविवारीही चालू
महेश बालभवन आता रविवारीही चालू राहणार आहे. शिवाय वयोगटाची मर्यादा 14 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पालकांच्या मागणीनुसार खास मराठी माध्यमाच्या शाळेतील मुला-मुलींसाठी शनिवारी, रविवारी विशेष वर्ग घेण्यात येतील, अशी माहिती महेश बालभवनचे अध्यक्ष शरद झंवर व श्रीकांत काकाणी यांनी दिली.