आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत बैठक ; अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - अंगणवाडी कृती समितीच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांच्याबरोबर सोमवारी (4 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचा-यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या.

महिला व बाल कल्याण मंत्री गायकवाड यांनी कृती समितीच्या पदाधिकाºयांबरोबर बैठक घेतली. बैठकीत एकरकमी रकमेचा लाभ, मानधनवाढ यासह विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अंगणवाडी सेविका-मदतनिसांना सेवानिवृत्तीनंतर मिळणा-याएकरकमी लाभासाठी त्यांचे योगदान अनुक्रमे 200 व 100 रुपये कपात केले जाणार नाहीत. त्याबाबतचे परिपत्रक काढण्याचे मान्य करण्यात आले. मानधनात 1 एप्रिलपासून अनुक्रमे 950 व 500 रुपये वाढ करण्यात आली होती. मात्र, ती देण्यात आले नव्हती. त्याचीही अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने 1 जुलै 2013 पासून मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 750 रुपये वाढ केली आहे. ते 15 दिवसांच्या आत देण्याचे मान्य झाले.
साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, टीए, डीए बिल एकरकमी देण्याबाबतचे परिपत्रक काढण्याचे, दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे, नवीन अंगणवाडी सेवकांची भरती करताना अर्हताप्राप्त मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रथम प्राधान्याने सामावून घेण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. संप काळातील मानधन, आजारीपणाची रजा, उन्हाळी सुटी, बालवाडी सेविकांची सेवा ग्राह्य धरणे, सेविका-मदतनिसांच्या वारसदारांना अनुकंपाचा लाभ देणे या प्रश्नांवर आगामी आठवड्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही मंत्री गायकवाड यांनी दिले. बैठकीला महिला व बालविकास खात्याचे सचिव उज्ज्वल उके, कक्ष अधिकारी दि. बा. पाटील, उपायुक्त डी. जे. मुंढे यांच्यासह कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील, शुभा शमिम, शरद संसारे, जीवन सुरुडे, सुकुमार दामले, नितीन पवार आदी उपस्थित होते.