आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पल्स पोलिओ लसीकरणाचा २२ फेब्रुवारीला दुसरा डोस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने २२ फेब्रुवारीला संपूर्ण शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मोहीमेंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील ४६ हजार २१९ बालकांना पोलिओ डोस देण्याच उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे.
१८ जानेवारीला राबवण्यात आलेल्या माेहीमेत ४४ हजार ७३ बालकांना पोलीओ लस देण्यात आली होती. २२ फेब्रुवारीला संपूर्ण शहरात १८५ पोलिओ बूथ, २२ ट्रान्झिट टिम व ६ फिरते पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोहीमेसाठी ६२५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनपाचे दवाखाने, अंगणवाडी, खासगी दवाखाने, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, टोलनाके व काही मंदिरे आदी ठिकाणी बुथची व्यवस्था केली आहे.ी लस दिली असली तरी, लस द्यावी, असे आवाहन केले आहे.