आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन-धन : एकाच दिवसात उघडली ४७ हजार खाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंतप्रधान जन-धन योजनेसाठी नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी २३ बँकांमध्ये ४७ हजार ६८० खाती उघडण्यात आली. त्यात सेंट्रल बँक आॅफ इंडिया १० हजार ५१५, बँक ऑफ महाराष्ट्र ९ हजार ३००, स्टेट बँक ऑफ इंडिया ५ हजार ८६१, आयडीबीआय बँक ४ हजार अशी खाती उघडण्यात आली.

देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक बचत खाते असावे, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. आधारकार्डशी संलग्न बँक खात्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीला बँकिंग सेवेचा लाभ मिळवून प्रत्येकाची आिर्थक प्रगती व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सगळ्यांसाठी बँक सेवा या उद्देशाने केंद्राच्या अर्थ विभागाने हे अिभयान सुरू केले आहे. या अिभयानांतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात येणार आहेत. जिल्हािधकारी अनिल कवडे यांच्या हस्ते शहरात या योजनेला सुरुवात झाली. खासदार दिलीप गांधी, आमदार अिनल राठोड यावेळी उपस्थित होते.

ही योजना दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. पहिला टप्पा १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत असणार आहे. या योजनेत एक लाखापर्यंत अपघात विम्याचे संरक्षण मिळते. खाते उघडल्यानंतर खातेदाराला एक रुपया डेिबटकार्ड आणि एक लाखांचे विमा सुरक्षा मिळेल. योजनेसाठी जिल्ह्यात २३ बँकांमध्ये ४७ हजार ६८० खाते उघडण्यात आली.

अख्ख्या गावाने उघडले खाते
या योजनेंतर्गत नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील संपूर्ण ग्रामस्थांनी बँक खाते उघडून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. नागरिकांना पैसे बचत करण्याची सवय लागावी, या हेतूने ही योजना केंद्राने सुरू केली आहे. योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर १ लाख रुपयांचा अपघात विमा, ३० हजार रुपये अतििरक्त विम्याचे कवच, भविष्यात जीवनविमा व निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे मांजरसुंबा गावातील सर्व ग्रामस्थांनी या योजनेंतर्गत बँक खाती उघडली आहेत.

खाते उघडण्यासाठी ग्रामस्थांनी बँकेत मोठी गर्दी केली होती. युनियन बँकेचे प्रबंधक संजय खेडकर, सरपंच जालिंदर कदम, संजीवनी मालवी आदी यावेळी उपस्थित होते. कदम म्हणाले, मांजरसुंबा गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी बँक खाते उघडून एक आदर्श समोर ठेवला आहे. संजय खेडकर म्हणाले, युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जन-धन योजनेंतर्गत खाते उघडण्यात आली आहेत. नागरिकांना सरकारी योजनेचा थेट लाभ होणार असून, तसेच कर्ज देखील थेट मिळणार आहे.