आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poet Ashish Ningurkar Sens Greeting To Celebrity

स्वत:साठी जगता जगता दुसर्‍यांसाठी जगून पहा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्वत:साठी जगता जगता दुसर्‍यांसाठी जगून पहा, दु:खाचं ऊन झेलून सुखाची सावली द्या, वळू नका भूतकाळात जाऊ नका भविष्यकाळाकडे, वर्तमानातच आहात तुम्ही, टाका पाऊल खर्‍याकडे, मग येईल नवी पहाट, नव्या आयुष्याचा उदय, मिळेल यश, कीर्ति व संपन्नता, हाच खरा दिवाळीनिमित्त शुभसंदेश..

नगरच्या नव्या पिढीतील कवी आशिष निनगूरकर यांनी यंदा दिवाळीनिमित्त ही कविता असलेली शुभेच्छापत्रे एक लाखजणांना पाठवली. त्यात सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, खेळाडू, कलावंत, आप्तेष्ट अशा सर्वांचा समावेश होता. त्यांच्या या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले. प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या हस्ते या शुभेच्छापत्राचे प्रकाशन करण्यात आले. हे शुभेच्छापत्र पाहून ते म्हणाले, ‘‘यातील कविता मनाला स्पशरून गेली. सामाजिक प्रबोधनाची ही कल्पना छान आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी, तसेच दु:ख विसरण्यास मदत करण्यासाठी या शुभेच्छांचा खूप उपयोग होतो.’’

मूळचा वांबोरीचा असलेला आशिष सध्या मुंबईत चंदेरी दुनियेत कार्यरत आहे. अनेक दूरचित्रवाणी मालिका व नियतकालिकांसाठी तो सध्या लेखन करतो.

नेहमीच्या तुलनेत यंदा शुभेच्छापत्रांची उलाढाल कमी झाली. बहुतेकांचा भर मोबाइल, व्हॉटअँप, फेसबुक व ई मेलवरून शुभेच्छा देण्यावर होता.

दीपावली..दीपावली..

मंगल दीपावली अवनीवर अवतरली तेजाचे महावस्त्र लेऊनिया जणू सजली रंक असो राव असो बाल वृद्ध युवती असो आनंदाचे निधान अर्पिण्या उदेली तिमिरातुन तेजाचा मार्ग दाखवी साचा दश दिशातुनी प्रकाश घेऊनिया आली.. चैतन्या ये उधाण मोद भरे ओसंडून नव आशा नव स्वप्ने आज मनी उमलली वर्ष नवे येई आज स्वागतास होऊ सज्ज भाग्याची सौख्याची शुभ घडी उगवली.. आकाशवाणीचे प्रदीप हलसगीकर यांनी आयोजित कार्यक्रमात डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी सादर केलेली कविता.