आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोटारीतील दोन लाखांची रोकड पोलिस पथकाने पकडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मारुती स्विफ्टमधील दोन लाखांची रोकड मंगळवारी पकडण्यात आली. या रकमेबाबत खुलासा करता न आल्याने पोलिसांनी गाडीसह वाहनचालकाला ताब्यात घेतले. याबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
निवडणूक शाखेच्या स्थिर सनियंत्रण पथकाकडून नगर-कल्याण महामार्गावर मंगळवारी वाहनांची तपासणी सुरू होती. जकात नाक्याजवळ कारवाई सुरू असताना नगरहून आळेफाट्याकडे चाललेल्या मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच 14 डीएन 8570) गाडीत 1लाख 99 हजार 20 रुपये एवढी रक्कम आढळून आली. या रकमेबाबत योग्य खुलासा करता न आल्याने पथकाने वाहनचालकास गाडी व रक्कम ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोिलसांकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. स्थिर सनियंत्रण पथकातील सहायक फौजदार कैलास शिरसाठ, ए. आय. शेख, दिगंबर शेलार यांनी ही कारवाई केली असल्याचे पथकाचे प्रमुख सुमित घोरपडे यांनी सांगितले.
टाकळी ढोकेश्वरमध्ये 15 लाख पकडले
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे भरारी पथकाने 15 लाखांची रोख रक्कम पकडली. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी चौकशी केल्यानंतर ही रक्कम बँकेची असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम नगर येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून टाकळी ढोकेश्वर येथील एटीएममध्ये भरण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. पथकाने पंचनामा केल्यानंतर वाहन सोडून दिले, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले.