आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावठी पिस्तुलांसह तीन आरोपी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गावठी पिस्तुलांची विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेले दोघे व गावठी पिस्तूल बाळगणारा एक अशा तिघांना पोलिसांनी गजाआड केले. मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींना तोफखाना पोलिसांनी तारकपूर परिसरात, तर तिस-या व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी सथ्था कॉलनीतील खालकर हॉस्पिटलसमोर ताब्यात घेतले.
महारसिंग इंदरसिंग जुनेजा व अनिल सनपत खरते (दोघेही मध्यप्रदेश) यांना तारकपूर बसस्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळाली. बाबासाहेब एकनाथ चेंडवाल (गुंजाळे, ता. राहुरी) याला खालकर हॉस्पिटलसमोरच्या पार्किंगमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडेही एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळाली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जुनेजा व खरते यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात, तर चेंडवाल याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.