आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला मारहाण करणारे गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाथर्डीतालुक्यातील आल्हनवाडी येथे पोलिसाला मारहाण करणाऱ्या नऊजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर रांग लावण्यास सांगितल्याचा राग येऊन जमावाने पोलिसाला मारहाण केली होती. पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, पोलिस नाईक दिगंबर कारखेले यांच्या पथकाने तत्काळ नऊ आरोपींना ताब्यात घेतले. बाबुराव कर्डिले (५३), बाळासाहेब गव्हाणे (३५), परमेश्वर कर्डिले (५०), पप्पू गव्हाणे (२४), अंबादास गव्हाणे (२४) यांचा आरोपींत समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...