आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह दडपण्यास पोलिसांचा हातभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे कायद्याची पायमल्ली करत लग्न लावण्यात आले. अल्पवयीन वधू लग्नाला नाखूष आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. तालुक्यातील १३ वर्षांच्या मुलींचे बालविवाह संगमनेर तालुक्यात होतात आणि अकोलेचे पोलिस निरीक्षक हे प्रकरण केवळ पोलिस स्टेशनच्या हद्दीचा तांत्रिक मुद्दा करत त्याबद्दल चौकशीची टाळाटाळ करत आहेत, असे हेरंब कुलकर्णी यांनी पत्रकारांशी सांगितले.

अकोलेतील १३ वर्षीय मुलीचा विवाह संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील एका तरुणाशी संगमनेर तालुक्यात लावण्यात आला. संबंधित मुलीने कुलकर्णी यांना भेटून याबाबत सांगितले. यानंतर अकोले पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

अकोले पोलिसांना अल्पवयीन मुलींच्या विवाहाची तक्रार देऊन दोन महिने उलटूनही कारवाई नाही. १३ वर्षांच्या दोन मुलींचे बालविवाह झाले आहेत. २१ जुलै २०१५ रोजी या अल्पवयीन मुलींच्या विवाहाला २१ सप्टेंबर रोजी दोन महिने पूर्ण झाले. अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिस एकमेकांच्या हद्दीकडे बोट दाखवत तपास करण्यास नकार देत आहेत. मागील पंधरवड्यात अकोलेच्या शाहूनगरमधील १३ वर्षांच्या मुलीचा विवाह संगमनेर तालुक्यातील झोळे येथे लावण्यात आला. आताही अकोले पोलिसांकडे फिर्याद दिली, तर ते पूर्वीचेच तेच ते उत्तर देणार आणि टाळाटाळ करणार हे नक्की असल्याने आता राज्य महिला आयोग आणि हे सुरू असतानाच आता आणखी एक बालविवाह झाला आहे. पण पोलिसांकडे जाता आता मुख्यमंत्री महिला आयोगाकडे दाद मागायचे ठरवले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. अकोले पोलिसांना मदत व्हावी म्हणून कुलकर्णी अॅड. रंजना गवांदे यांनी संगमनेर पोलिस स्टेशनचे पोलिस उपाधीक्षक, संगमनेर तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याकडेही अर्ज दिला आहे. पाठपुरावा केला परंतु उपयोग झाला नाही. अकोले संगमनेर या दोन्हीही प्रशासनाला तक्रार देऊनही आज दोन महिने उलटले, तरी आरोपींची चौकशीही करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन पाठवले, तरीही स्थानिक प्रशासनाने याबाबत लक्ष घातले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी अकोलेचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अकोले पोलिसांनी जबाबदारी झटकली
अकोले तहसीलदारांनी या प्रकरणात पोलिसांचे लक्ष वेधून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु अनेकवेळा पाठपुरावा करूनही अकोले पोलिस स्टेशनने हा गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही. तेव्हा संगमनेर तालुक्यात तक्रार द्या, असे लेखी पत्र देऊन ते जबाबदारी झटकून मोकळे झालेत. हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, अकोले.

पोलिस निरीक्षकांवर कारवाईची मागणी करू
हद्दीतीलवाद करता चौकशीसाठी हा गुन्हा शून्य क्रमांकाने संगमनेर ठाण्यात वर्ग करता आले असते. मात्र, अकोले पोलिस चौकशीबाबत असंवेदनशीलता दाखवत आहेत. याबाबत संबंधित पोलिस निरीक्षकांवर कारवाईची मागणी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.