आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; 30 जणांना पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - गुन्हेगारांवर वचक व ठोस कारवाईसाठी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्तअधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी शहरातील गुन्हेगारांच्या वास्तव्याच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले.

श्रीरामपुरातील गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांचा वचक नसल्याने पोलिस अधीक्षक शिंदे यांनी कोम्बिंग ऑपरेशनचा आदेश दिला. पोलिस अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या कर्मचार्‍यांनी 33 गुन्हेगारांना ताब्यात घेतले. काहींकडील शस्त्रेही जप्त केली.

छाप्यांदरम्यान बेलापूर, नेवासे, संगमनेर व पुणतांबे रस्त्यांची नाकेबंदी व वाहनांची तपासणी करण्यात आली. फकिरवाडा, डावखर रस्ता, कुंभारगल्ली, सुभेदार वस्ती, गोंधवणी वडारवाडा, सूतगिरणी आदी भागांतील घरांवर छापे घातले. चार तास ही कारवाई सुरू होती. ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे. 4 निरीक्षक 12 उपनिरीक्षक, 164 कर्मचारी, 40 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या 2 तुकड्या, नगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे 32 कर्मचारी अशा सुमारे पावणेतीनशे कर्मचार्‍यांनी कारवाई केली.

गुन्हेगारांवर लगाम
शहरात काही दिवसांत गोळीबाराच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर शहरात दहशतीचे वातावरण होते. गुन्हेगारांकडे असलेली घातक शस्त्रे पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. पकडण्यात आलेले सर्व आरोपी फरार होते.’ सुनीता साळुंके, अतिरिक्त पोलिस अधीक्षक