आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजारांची लाच घेताना पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वाळूतस्करीच्या गुन्ह्यात आरोपी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना कोतवाली ठाण्याच्या पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. संजय रघुनाथ काळे असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (२७ जानेवारी) सायंकाळी ही कारवाई केली.
कोतवाली पोलिसांनी वाळूचोरी करणारा टेम्पो (एमएच १३ जी ००७५) पकडून गौणखनिज कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. चालकाला अटक करून टेम्पो ठाण्याच्या आवारात लावण्यात आला. या गुन्ह्यात अटक करू नये टेम्पो सोडून देण्यासाठी काळे याने १५ हजारांची लाच मागितली. तडजोडीतून लाचेची रक्कम दहा हजार रुपये झाली. यासंदर्भात टेम्पो मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. कल्याण रस्त्यावरील सम्राट ढाब्यावर तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना पथकाने काळे याला जेरबंद केले. पोलिस उपअधीक्षक अशोक देवरे, निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.