आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपमान सहन नाही झाला, त्‍याने मित्राचा "गेम' केला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळलेल्या संजय मदनलाल दोशी (आनंदपार्क, मार्केटयार्डमागे, सारसनगर) यांचा पुण्यात उपचार सुरू असताना सहा दिवसांनी मृत्यू झाला. मारहाण करून त्यांचा खून झाल्याचे दोन आठवड्यांनंतर स्पष्ट झाले. अपमान सहन झाल्यामुळे मित्रांनीच हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी संजय ढापसे याच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ढापसेला अटक झाली असून त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
संजय दोशी हे २० जुलैला रात्री अकराच्या सुमारास जखमी अवस्थेत औरंगाबाद रस्त्यावरील दीपाली टॉकिजजवळच्या चौकात पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २१ जुलैला त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे बंधू प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घरातून जाताना भावाने संजय ढापसे याच्याकडे जातो, असे सांगितले होते. नेहमीप्रमाणे ते हॉटेलमध्ये गेले. तेथे मित्रांसमवेत गप्पा मारत सर्वजण दारु प्यायले. दारु पिताना काही कारणावरुन किरकोळ वाद झाले. बाचाबाची झाल्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना बाहेर काढले.दोशींमुळेच हा अपमान सहन करावा लागला, असे वाटून ढापसे, बबलू सुभेदार (झेंडीगेट) अन्य एका मित्राला राग आला. त्यांनी दोशी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दोशींना सोडून तिघेही निघून गेले. आपण केलेल्या कृत्याचे शुटिंग हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची कल्पना आल्यावर तिघांनी तेथे जाऊन बळजबरीने सीसीटीव्ही फुटेज काढून टाकले.

पोलिसांनी हॉटेलची तपासणी केली असता फुटेज बळजबरीने काढून नेल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी दुपारी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ढापसेची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.