आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Department Should Strength Intelligence Said Khopde

पोलिसांकडे सशक्त गुप्तहेर खाते हवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे - Divya Marathi
माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे
नगर- पोलिसांकडेसशक्त गुप्तहेर खाते नसल्याने त्यांना गुन्हेगारच माहिती नसतात. त्यामुळे ते कारवाई कोणावर करणार? दंगली रोखायच्या असतील, तर पोलिसांकडे सशक्त गुप्तहेर खाते असणे आवश्यक आहे, असे मत माजी पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले.

येथील प्लस फाउंडेशनच्या वतीने खोपडे यांचे व्याख्यान पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आले. "जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता' या विषयावरील व्याख्यानात ते म्हणाले, समाजाची सर्व व्यवस्था माणसांनी निर्माण केली असल्याने या व्यवस्थेत बदलही माणसेच करू शकतात. जाती-जातीत किंवा धर्मावरून माणसांमध्ये तेढ निर्माण होते, ती आपण वाचलेला भारताचा इतिहास, शालेय अभ्यासक्रमातील इतिहास, निवडणुकीत जातीनुसार निवडला जाणारा उमेदवार, जातीनिहाय केले जाणारे मतदान, प्रक्षोभक भाषणे लिखाणावर होणारी शिक्षा यामुळे! स्वधर्माविषयी अभिमान परधर्माविषयी काहीशी दुराव्याची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने लोकांच्या मनातील राग, तणाव कायम वाढलेला असतो. त्याला काही तत्कालीन कारण मिळून त्याचा स्फोट होऊन दंगल उसळते. दंगल अचानक होत नाही, तिला ही मागची सर्व पार्श्वभूमी जबाबदार असते, असे खोपडे यांनी सांगितले.

पोलिसांची मानसिकता स्पष्ट करताना खोपडे म्हणाले, पोलिसांचे काम अग्निशामक दलाप्रमाणे चालते. दंगल उसळली आहे, शांत करायला जा, शमली की पुन्हा पेटायची वाट पहा... दंगली होऊच नयेत, म्हणून पोलिस यंत्रणा काम करत नाही. पोलिसांकडे सशक्त गुप्तहेर खाते नसल्याने त्यांना गुन्हेगारच माहिती नसतात. मग ते कारवाई कोणावर करणार? सूत्रसंचालन डॉ. अंशू मुळे यांनी केले, तर आभार डॉ. महेश मुळे यांनी मानले.
मानसिकता बदलावी
कालबाह्यपद्धतीने पोलिस काम करतात. पोलिस यंत्रणा कालबाह्य कुचकामी आहे, हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने आपल्याला दाखवून दिले. त्यासाठी प्रथम प्रशासनाची मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक माणसाने हे केले, तरच सुरक्षित, समृद्ध निरोगी समाज निर्माण होईल, असे खोपडे यावेळी म्हणाले.