आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Man Get Two Years Improsment In The Case Of ATM

एटीएम फोडल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍याला दोन वर्षे सक्तमजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिस कर्मचारी अंकुश राजेंद्र कुलांगे व पोलिस पुत्र आतिक युनूस शेख याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी बुधवारी दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नगर-पुणे रस्त्यावर एसबीआयचे एटीएम आहे.पोलिस कर्मचारी असलेल्या कुलांगे याने दोन पोलिसपुत्रांना बरोबर घेऊन या एटीएममधील रक्कम चोरण्याची योजना बनवली. गॅसकटर घेऊन 23 सप्टेंबर 2010 रोजी पहाटे तीन वाजता ते एटीएमजवळ आले. तनवीर उमर सय्यद या सुरक्षारक्षकाला जबर मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून एटीएमच्या केबिनमध्ये टाकण्यात आले. नंतर गॅसकटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे कुलांगे रजेवर असताना खाकी वर्दीत हा उद्योग करत होता. गस्त घालण्यासाठी पोलिसांची गाडी आल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी पळून जात असताना जवळच राहणार्‍या पोलिस कर्मचारी कीर्ती कांजवणे व त्यांच्या वडिलांनी त्यांनी बघितले. कुलांगेला त्याचवेळी निलंबित करण्यात आले.

न्यायाधीश इंदलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले. कांजवणे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्य धरून इंदलकर यांनी कुलांगे व शेखला शिक्षा ठोठावली. तिसरा आरोपी गणेश विठ्ठल केदारी याची सबळ पुराव्याअभावी निदरेष मुक्तता करण्यात आली.

रंगेहात पकडले
रजेवर असलेल्या पोलिस कर्मचारी कुलांगे याने दोन पोलिसपुत्रांना बरोबर घेऊन एटीएममधील रक्कम चोरण्याची योजना बनवली. मात्र, पेट्रोलिंगसाठी आलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.