आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Recruitment Issue At Ahmednagar, One Arrested

पोलिस भरतीप्रकरणी आणखी एकाला कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी व लेखी परीक्षेसाठी बनावट उमेदवार बसवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राम बुधासिंग खोकड (अंबड, जालना) याला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. राजकारणे यांनी मंगळवारी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली. अंतरिम निवड यादीत निवडल्या गेलेल्या गोपाल रतनसिंग ब्रम्हनाथ याच्या जागेवर राम खोकड याने मैदानी चाचण्या व लेखी परीक्षा दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी त्याला ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांकडे दिले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली असून आणखी चार आरोपी पसार आहेत. खोकड याची औरंगाबाद जिल्हा पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई पदावर निवड झाली असून मित्रासाठी केलेली मदत त्याला चांगलीच महागात पडली आहे.