आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"झिरो चेन स्नॅचिंग'चे पोलिसांसमोर लक्ष्य"

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील काही महिन्यांपासून शहरात नाकाबंदी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे "चेन स्नॅचिंग'चे प्रकार जवळपास बंद झाले आहेत. वर्षातील काही महत्त्वाच्या सणांच्या दिव शी, दिसातील ठरावीक वेळेत शहराच्या विशिष्ट भागात "चेन स्नॅचर्स' सक्रिय होतात, असा आजवरचा अनुभव आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत आहेत. धूमस्टाइल "चेन स्नॅचिंग'चे प्रकार पूर्णपणे बंद होणे अशक्य असले, तरी काळजी घेतल्यास हे प्रकार नक्कीच कमी होतील, असा पोलिसांना विश्वास आहे.

पुण्या-मुंबईतील धूमस्टाइल चेन स्नॅचिंगचे लोण काही वर्षांपूर्वीच नगरमध्ये आले. शहरातील तोफखाना, कोतवाली हद्दीत, शिर्डी, श्रीरामपूरसारख्या शहरांमध्ये असे गुन्हे अधिक प्रमाणात घडले आहेत. कमी धोका कमी श्रम असलेल्या या गुन्ह्यांमध्ये करण्याची पद्धत सोपी, अारोपी पकडले जाण्याची शक्यता कमी, तसेच चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे असते. त्यामुळे हे प्रकार वाढत गेले. एक दुचाकी ती चालवण्यासाठी साथीदार एवढेच भांडवल लागते. चोरलेले दागिने सराफी दुकानात विकता येतात. कमी भावात मिळणारे असे दागिने काही सराफ घेतात. एकदा सोने वितळून त्याची चीप बनवली की पुरावा संपला, असे त्यांना वाटते. त्यामुळे "चेन स्नॅचिंग'चे प्रकार वाढले.

चेन स्नॅचिंग गुन्ह्याच्या तपासात पाेलिस सराफी दुकानात जाऊन चोरीचा माल जप्त करतात. चोरीचे दागिने घेणा सराफालाही गुन्ह्यात अटक करण्याची तरतूद आहे. पण सुरुवातीला पोलिस सराफाला साक्षीदार करत अजाणतेपणे माल घेतल्याची साक्ष नोंदवत. मात्र, अनेक सराफ साक्षीदार न्यायालयात फितूर झाल्यामुळे पकडलेले आरोपी सुटत. त्यामुळे नंतर पोलिसांनी सराफांनाही आरोपी करण्यास सुरवात केली. पण दोषारोप पत्रातील त्रुटी, प्रत्यक्ष घटना खटला यादरम्यानचा कालावधी, साक्ष देताना महिलांची होणारी तारांबळ यामुळे आरोपींच्या सुटकेचे प्रमाण वाढत राहिले. शिक्षा होत नसल्यामुळे धूमस्टाइल चोरांचे धाडस वाढले.

गुन्ह्याची सोपी पद्धत असल्यामुळे बेरोजगार तरुण याकडे आकर्षित झाले. ग्रामीण भागातील भामट्यांनी शहरात येऊन असे गुन्हे केल्याचे उघड झाले. काही परप्रांतीय आरोपीही अशा गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झाले. चोरीच्या विशिष्ट पद्धतीमुळे पोलिस ठाण्याजवळ घटना घडली, तरीही आरोपी पकडले जात नाहीत. अचानक घडलेल्या घटनेमुळे महिलांना आरोपींचे वर्णन आठवत नाही दुचाकीचा क्रमांकही. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अवघड होते. शाय बचदा अशा गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणा दुचाकींचे नंबरची चुकीचे असल्याचे समोर आले. मात्र, नाकाबंदी माेहिमेत अशा मोटारसायकली सापडतात. त्यामुळे काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार थांबले आहेत.

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील मोकळे असलेले आरोपी नव्याने तयार होणारे गुन्हेगार यामुळे या घटना थांबलेल्या नाहीत. त्या पूर्णपणे थांबणारही नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याकरिता काळजी घेणे, हाच खबरदारीचा उपाय आहे, असे पोलिसांना वाटते. याशाय इतरही काही मार्ग अवलंबणे पोलिसांनी सुरु केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये जागृती करण्यावर भर दिला जात आहे.

खबरदारी हाच उपाय
चेनस्नॅचिंगचे प्रकार पूर्ण बंद होणे कठीण आहे. गुन्हेगार प्रत्येक वेळी नवनवे प्रकार अवलंबतात. अपु मनुष्यबळामुळे प्रत्येक महिलेला संरक्षण देणे अशक्य आहे. पोलिसांचे "फिक्स पॉइंट' लावले, तरी कुठे ना कुठे असे गुन्हे घडणार. नाकाबंदी हा एकमेव उपाय करुन भागणार नाही. त्यामुळे महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणे, हाच चेन स्नॅचिंग रोखण्याला पर्याय आहे. महिलांनी सहकार्य केले, तर झिरो चेन स्नॅचिंगचे लक्ष्य गाठता येईल.'' डॉ.सौरभ त्रिपाठी, जिल्हापोलिस अधीक्षक.

सीसीटीव्ही कॅमेरे
कोतवाली तोफखाना हद्दीतील ठरावीक भागातच चेन स्नॅचिंग होते. माळीवाडा परिसर, नवा जुना टिळक रस्ता, बुरुडगाव रस्ता, कोठी रस्ता, तर सावेडीतील पाइपलाइन रस्ता, भिस्तबाग चौक परिसर, कुष्ठधाम रस्ता, गुलमोहोर रस्ता, प्रोफेसर कॉलनी रस्ता, तपोवन रस्ता, बालिकाश्रम रस्ता यासह ठरावीक कॉलन्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार होतात. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच पोलिसांचा विचार आहे, जेणेकरुन पोलिसांचे "फिक्स पॉइंट' नसलेल्या काळात या परिसरात "वॉच' राहिल. याकरिता मनपा, जिल्हा प्रशासन, सामाजिक खासगी संस्थांची मदत घेतली जाईल.

"एसएमएस'द्वारे जनजागृती
महिलायुवतींना आवाहन करुनही चेन स्नॅचिंगला पूर्ण आळा बसलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यास सांगणे, जनजागृती करत राहणे हेच उपाय आहेत. पोलिसांना प्रत्येक घरी जाऊन अशी जनजागृती करणे शक्य नाही. त्यामु‌ळे "स्मार्ट एसएमएस अलर्ट प्रणाली'चा आधार घेतला जात आहे. या प्रणालीमुळे मोबाइलधारक महिलांना पोलिसांकडून "एसएमएस'द्वारे काळजी घेण्याचे आवाहन करुन उपाययोजना सूचवल्या जात आहेत.

नाकाबंदी मोहिमेत सातत्य ठेवणार
शहरात गेल्या काही महिन्यांपासून नाकाबंदी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत दुचाकी चारचाकी वाहनचालकांची कागदपत्रे तपासली जातात. दोषींवर दंडात्मक कारवाईही केली जाते. या मोहिमेमुळे विनाक्रमांकाच्या चोरीच्या दुचाक्या रस्त्यावर येणे बंद झाले आहे. परिणामी चेन स्नॅचिंगचे प्रकार बंद झाले आहेत. मध्यंतरी ही मोहीम बंद झाली, तेव्हा शहरात पुन्हा चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. त्यामुळे या मोहिमेत सातत्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांना शिस्त लागण्यासह चेन स्नॅचिंग प्रकारांनाही त्यामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...