आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावात कडेकोट पोलिस बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- धार्मिक स्थळाचे विनापरवाना बांधकाम व या जागेच्या शेजारी राहणार्‍या महिलेला झालेल्या दमबाजीतून केडगावात सोमवारी (3 फेब्रुवारी) रात्रीपासून दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्डे यांच्या नेतृत्वाखाली शाहूनगर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाहूनगर परिसरात एका धार्मिक स्थळाचे खासगी वापराच्या जागेवर बांधकाम होत असल्याने महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वीच तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. या जागेच्या शेजारी राहणार्‍या महिलेला सोमवारी सायंकाळी दमदाटी करण्यात आली. तिच्या फिर्यादीवरून बेकायदेशीरपणे घरात घुसण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांतील तणाव वाढल्याने सोमवारी रात्रीपासून तैनात करण्यात आलेला बंदोबस्त मंगळवारी कायम होता.

महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्‍न चिघळला आहे. मशिदे फिरदेशी नावाच्या ट्रस्टला संबंधित जागेवर रहिवासी बांधकाम करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. रहिवासी बांधकामाच्या परवान्यावर या ठिकाणी धार्मिक स्थळाचे बांधकाम होत असल्याने स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.